शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

यंदा आदिशक्तिच्या गळ्यात महाग फुलांच्या माळा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 14:14 IST

खान्देशात नाशिकच्या ङोंडूला मागणी , दहापट दर वधारले

ठळक मुद्दे ङोंडुच्या फुलांचे कॅरेट 600 रुपयांनाखान्देशात पावसाअभावी फुलांचे उत्पादन अत्यल्प सण-उत्सवाच्या पर्वावर भावात तेजी 

 ऑनलाईन लोकमत / जिजाबराव वाघ

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 9 -  नरात्रोत्सवात आदिशक्तिचा जागर आणि तजेलदार ङोंडू फुलांच्या माळा असा उत्साही दरवळ  असतो. यंदा मात्र खान्देशावर पावसाची वक्रदृष्टी झाल्याने सर्व प्रकारची  फुलं कमालीची महागली आहेत. फुलांचे उत्पादन घटल्याने थेट नाशकातून फुले आयात करावी लागत आहे. सर्व प्रकारच्या फुलांचे दर यंदा दहापट वधारले असून दस:याला ङोंडुच्या फुलांचे दर  200 रुपये प्रतिकिलो होण्याचा अंदाज  विक्रेत्यांनी बोलून दाखविला. पोळ्याच्या पर्वानंतर सण-उत्सवांची लगबग वाढते. व्रत-वैकल्यांचाही बहर असतो. साहजिकच पूजा-अर्चा,धार्मिक कार्यक्रमांना उधाण येते. पूजेत मानाची जागा घेणा:या फुलांचीही मागणी वाढते. गेल्यावर्षी पावसाने सरासरी ओंल्याडल्याने खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात फुलशेती बहरली होती. याचाच परिणाम गतवर्षी ङोंडूच्या फुलाचे दर 10 रुपये प्रतिकिलो असे खाली कोसळले होते. यावर्षी पावसाने नाशिकला झुकते माप देताना खान्देशात दडी मारली. यामुळे खान्देशातील फुलशेती सुकली असून उत्पादनही मोठय़ा प्रमाणात घटले. विक्रेत्यांना नाशिकच्या बाजारपेठेतून फुले आणावी लागत  आहे. गणपती उत्सव, गौरी गणपती, पितृपक्ष, भुलाबाई, नवरात्रोत्सव, विजयादशमी अशा सण-उत्सवाच्या मांदियाळीत फुलांच्या दरवळाने भावभाक्तिही फुलून येतो. यावर्षी फुलांचे भाव गतवर्षाच्या तुलनेत पाच ते दहापट वाढले असून दरवाढीची ही अतिषबाजी दिवाळीतदेखील कायम राहणार आहे.  

 ङोंडुच्या फुलाचे पाच किलोचे एक कॅरेट 400 ते 600रुपयांपयर्ंत आहे. सद्यस्थिती प्रतिकिलो 150 ते 200 रुपये मोजावे लागतात. नवरात्रोत्सवात हे भाव काहीअंशी वाढणार आहेत. खान्देशात उत्पादन नसल्याने नाशिक येथून फुले आणण्याचा वाहतुक खर्चही होत आहे. गेल्यावार्षी ङोंडुच्या फुलाचे कॅरेट 80 ते 100 रुपयांना विकले गेले.  शेवंतीच्या फुलांमध्येही दरवाढ झाली आहे. गेल्यावर्षी 100 रुपये प्रतीकिलो असणारे भाव यंदा 400 रुपयांपयर्ंत उसळी घेत आहे. नाशिकच्या बाजार समितीत फुले खरेदी करणा-या व्यापा-यांची झुबंड उडत असल्याने दरदिवशी दर वाढतात.  गुलाबाच्या 100 फुलांसाठी 500 रुपये मोजावे लागतात. गुलाबाच्या फुलाची प्रतीनग विक्री 10 रुपये अशी आहे. गतवर्षाच्या तुलनेत हे दर दुप्पट आहेत. त्यामुळे फुलमाळींमध्ये डोकावणारा गुलाब यंदा विरळ झाला आहे.  जरबरा आणि फुलमाळी हे मनोहारी समीकरण. यंदा जरबराही उसळी घेत असून प्रतीनग 40 रुपये असे चढे भाव आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे दर दुप्पट आहेत. लिली दरहजारी 500 रुपयांपयर्ंत भाव खाऊन आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे दर पाच ते सहा पट वाढले आहे. गेलेंडा, तेरडा, निशीगंध, कुंदा या फुलांच्या दरातही तेजी आहे. गेलेंडा 60 तर तेरडा 30 ते 60 रुपये प्रतीकिलो दराने विकला जात आहे. गेल्यावर्षी निशीगंधचे दर 200 रुपये प्रतिकिलो होते. यंदा हे भाव 400ते500 रुपये असे वाढले आहेत. कुंदाची फुलेही भाव खाऊन आहेत. 500ते900 रुपये प्रतिकिलो अशी त्याची विक्री होत असून गेल्यावर्षी 300 ते 400 असे  त्याचे भाव होते. 

 गेल्या काही वर्षात खान्देशात फुलशेतीचे प्रयोग यशस्वी झाल्याने फुलांचे भाव स्वस्त झाले आहे. पाच ते सात वर्षापूर्वी नाशिकच्या फुलांची मक्तेदारी होती. यावर्षी खान्देशात पावसाने पाठ फिरविल्याने नाशिक येथून फुले विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. सर्व प्रकारच्या फुलांचे दर गरवषार्पेक्षा यंदा पाच ते दहापट वाढले आहेत. फुलहारांचे दरही दुप्पट झाले आहे. गेल्या वर्षी नंदुरबार जिल्ह्यातून फुले खरेदी केली होती.  नाशिक येथून फुले आणण्याचा वाहतूक भुदर्ंडही लागतो. -वाल्मीक  फुलवारी, फुल विक्रेते, चाळीसगाव