शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

यावलच्या सराफाला लुटणा-या एकाला पिस्तुलसह पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 20:09 IST

पिस्तुलाचा धाक दाखवून यावलच्या सराफाला लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास शहरातील पांडे चौकात सापळा लावून पकडले. गौरव भरत कुवर (२९, रा.कासमवाडी, जळगाव) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल व तीन जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे पांडे चौकात लावला सापळा   तीन जीवंत काडतूसही हस्तगत

जळगाव : पिस्तुलाचा धाक दाखवून यावलच्या सराफाला लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास शहरातील पांडे चौकात सापळा लावून पकडले. गौरव भरत कुवर (२९, रा.कासमवाडी, जळगाव) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल व तीन जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल येथील श्रीनिवास नंदकिशोर महालकर (४२) यांचा सराफाचा व्यवसाय आहे. रविवारी दुकान बंद करुन ते घरी जात असताना आकाश सुरेश सपकाळे, गौरव भरत कुवर (दोन्ही रा.जळगाव), चेतन कोळी व यश उर्फ गोलु पाटील (दोन्ही रा.यावल) या चौघांनी महालकर यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करीत ५ लाख ६२ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २ लाख २३ हजार ६०० रुपये किमतीची सात किलो ५७० ग्रॅम चांदी असलेली बॅग हिसकावून पळ काढला होता.पांडे चौकात लावला सापळाया दरोड्यातील एक संशयित जळगाव शहरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांना मिळाली होती. सर्व अधिकारी व कर्मचारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्तात असल्याने रोहोम यांनी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी चर्चा करुन पथक तयार केले. उपनिरीक्षक सुधाकर लहारे,  शरीफ काझी, युनुस शेख, सूरज पाटील, दत्तात्रय बडगुजर, प्रकाश महाजन व दर्शन ढाकणे अशांच्या पथकाने मध्यरात्री पांडे चौकात साध्या गणवेशात सापळा लावला. गौरव हा चौकात येताच पथकाने त्याला घेरले. अंगझडती त्याच्याजवळ एक गावठी पिस्तुल व तीन जीवंत काडतूस आढळून आले. दरम्यान, त्याच्या अन्य साथीदार व मुद्देमालाची चौकशी पथकाकडून केली जात आहे. गौरव याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव