शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

यावलला अतिवृष्टी !

By admin | Updated: July 15, 2014 12:22 IST

दमदार पावसानंतर हतनूर धरणाची जलपातळी वाढली असून रावेर तालुक्यातील मंगरूळ धरण ओसंडून वाहू लागले आहे. यावल तालुक्यात ६६.१ मि.मी. पावसासह अतिवृष्टी तर फैजपूरला ११६ मि.मी. पावसाचीे नोंद झाली आहे.

 जळगाव : दमदार पावसानंतर हतनूर धरणाची जलपातळी वाढली असून रावेर तालुक्यातील मंगरूळ धरण ओसंडून वाहू लागले आहे. यावल तालुक्यात ६६.१ मि.मी. पावसासह अतवृष्टी तर फैजपूरला ११६ मि.मी. पावसाचीे नोंद झाली आहे. भुसावळसह परिसरात रविवारी रात्रभरात २८.६ मिलीमीटर पाऊस झाला. हतनूर धरणात शनिवारी सकाळी १८.६३ टक्केतर सोमवारी सकाळी २४.0८ टक्केइतका जलसाठा होता. रावेर तालुक्यात दमदार पावसामुळे मंगरूळ प्रकल्प दुसर्‍याच पावसात ओव्हरफ्लो झाल्याने भोकर नदी वाहू लागली आहे. तिथे सोमवारी ३१.८५ मि.मी. पाऊस झाला. सातपुड्यात अतवृष्टीझाल्याने वड्री बंधारा पूर्ण भरला तर हरिपुरा धरणात ६0 टक्के साठा झाला. खडकाई, हडकाई नद्यांना पूर आला. बोदवडसह मुक्ताईनगर तालुक्यात मध्यरात्री रिपरिप सुरू होती. अमळनेर आणि चोपडा तालुक्यात पहाटे चांगला पाऊस झाला आहे. पाचोरा व भडगाव परिसरात मात्र मध्यम पाऊस झाला.धरणगाव शहर व तालुक्यातही शेतशिवार भिजवले. जामनेर येथे रविवारी रात्री झालेल्या रिमझिम पावसावरच शेतकर्‍यांनी पेरणी सुरू केली आहे. एरंडोल तालुक्यात सोमवारी पहाटे तासभर जलधारा बरसल्या.

---------

 

पर्जन्यमान (मि.मी.मध्ये) :

जळगाव- ३७, भुसावळ- १९, यावल- ७३, रावेर- ३४.७, मुक्ताईनगर- १३.९, अमळनेर- १0.७, चोपडा- ५२, एरंडोल- १६, पारोळा- 00, चाळीसगाव- २, जामनेर- ८.६, पाचोरा- २.८, भडगाव- 00 धरणगाव- २८.६, बोदवड- १0. ■ १0 जुलैअखेरपर्यंत कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार जिल्हाभरात फक्त एक लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्हाभरातील सात लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी होईल, असे उद्दिष्ट आहे.  ■ पेरणीमध्ये कापूस आघाडीवर आहे. कापसाची लागवड ही एक लाख ४३ हजार हेक्टरवर झाली आहे. मक्याची पाच हजार, मूग १३00, उडीद १८00, सोयाबीन ३२३, ज्वारी ३२३ तर तुरीची ८0 हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या दोन दिवसात पेरणीला वेग आला आहे.  ■ भुसावळ, बोदवड, अमळनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव, जामनेर, भडगाव या तालुक्यांत सध्या तरी पेरणीसारखी स्थिती नाही. दीड लाख हेक्टरवर पेरणी