शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

यावल तालुक्यात आदिवासी पाड्यावरील लसीकरण मोहीम फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 14:50 IST

यावल , जि.जळगाव : यावल तालुक्यात गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे. मग ती गावे रस्त्यावरची ...

ठळक मुद्देयावल तालुक्यातील दुर्गम भाग पथकाने काढला पिंजून१२ किलोमीटर पहाडी रस्त्याचे अंतर कापून पोहचले वैद्यकीय पथक

यावल, जि.जळगाव : यावल तालुक्यात गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे. मग ती गावे रस्त्यावरची असोत की दुर्गम भागातील वैद्यकीय पथकास तेथे जावेच लागते.तालुक्याच्या सीमेवरील सातपुड्याच्या कुशीत अनेक आदिवासी वस्त्या, पाडे अत्यंत दुर्गम भागात आहेत. येथे जाण्यासाठी सातपुड्याच्या डोंगर-कपारीतून पायवाटेने जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सुमारे १५०-२०० आदिवासी वस्तीच्या आंबापाणी वस्तीवर १२ किलोमीटर पहाडी रस्त्याने जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊनच जावे लागते. वैद्यकीय पथकाने या वस्तीवर जावून लसीकरणाची मोहीम नुकतीच फत्ते केली. वस्तीशाळेच्या पटावरील ३९ पैकी ३७ विद्यार्थ्यांना पथकाने लसीकरण केले. दोन विद्यार्थी आजारी असल्याने त्यांना लस दिली नसल्याचे पथकाने सांगितले.तालुका सीमेवरील सातपुड्याच्या कुशीतील आंबापाणी आदवासी गाव हे अत्यंत दुर्गम भागात आहे.येथील लसीकरणासाठी डॉ.गौरव भोईटे, डॉ.प्रवीण ठाकरे हे पथकासह दुचाकीवरुन जाण्यासाठी निघाले, मात्र सातपुड्यातील दाट झाडी, उतार-चढावाचा रस्ता, वाटेतील मोठमोठे खडक आणि दगड यामुळे दुचाकी चालवणे जिकरीचे झाले.दोन-तीन वेळा दुचाकी घसरून पडली. अखेर पथकाने सातपुड्याच्या कुशीतच दुचाकी सोडून सुमारे १२ किलोमीटर डोंगर-माथ्याचे अंतर पायी कापून पथक आंबापाणी वस्तीवर पोहचले.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बºहाटे यांनी लसीकरण मोहिमेत १०० टक्के सहभागी होण्याचे केलेले आवाहन आणि वैद्यकीय पथकाची जिद्द त्यात अनेक ठिकाणी होत असलेला विरोध, त्यातही आदिवासी वस्तीवरील ही विद्यार्थी लसीकरणास सहभागी होतील की नाही, ही शंका पथकाच्या मनात होतीच, मात्र आदिवासी बांधवांना डॉ.गौरव भोईटे, डॉ.प्रवीण ठाकरे यांनी गोवर आजारापासूनचा अपाय आणि लसीकरणाचे लाभ यांची पालकांना जाणीव करून दिल्यानंतर आदिवासी पालकांनी आपल्या सर्व बालकास प्रोत्साहीत करून ३९ पैकी ३७ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याने डोंगर-माथ्याचा रस्ता पार करून आलेल्या पथकासही आनंद झाला. आदिवासींशी बोलून त्यांनी आनंद व्यक्त केला. पथकात आरोग्यसेविका जुनव तडवी, आरोग्य सेवक लुकमान तडवी, अरविंद जाधव, शिवप्रताप घारू या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

टॅग्स :Healthआरोग्यYawalयावल