शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

यावल ग्रामीण रुग्णालय चालते ‘प्रभारीं’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 18:08 IST

गेल्या अनेक दिवसांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात एकही नियमित डॉक्टर नसल्याने हे रुग्णालय केवळ प्रथमोपचार केंद्र ठरत आहे. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी रुग्णांना जळगावला न्यावे लागते. यामुळे तो खर्चिक उपचार ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्दे३० वर्षे जुन्या रुग्णालयात समस्या आजही कायमरुग्णालय ठरतेय केवळ प्रथमोपचार केंद्रयावल ग्रामीण रुग्णालय समस्यांचे माहेरघर

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात एकही नियमित डॉक्टर नसल्याने हे रुग्णालय केवळ प्रथमोपचार केंद्र ठरत आहे. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी रुग्णांना जळगावला न्यावे लागते. यामुळे तो खर्चिक उपचार ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासह विविध समस्यांनी हे ग्रामीण रुग्णालय ग्रासले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे ग्रामीण रुग्णालय ‘प्रभारीं’वर चालते. लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.गेल्या ३० वर्षांपासून सुरू झालेल्या येथील ग्रामीण रुग्णालयात आजपर्यंत वर्ग १चे पद असलेले वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त आहे. यासह डॉक्टरांची पदे गेल्या अनेक वर्षापासून ११ महिन्यांच्या करारावर भरली जातात. त्यामुळे डॉक्टर मंडळी येथे येण्यास अनुत्सुक असतात. परिणामी अनेक दिवस ही पदे रिक्त राहतात. या काळात बाह्यरुग्ण तपासणीसाठी शालेय आरोग्य पथकाचे डॉक्टर तपासणी करतात. त्यानंतर दिवसभर रात्री एकही डॉक्टर राहत नसल्याने आदिवासी भागासह तालुक्यातील खेड्या-पाड्यातून आलेल्या रुग्णावर आरोग्य सेविका प्राथमिक उपचार करतात. त्यानंतरच्या उपचारासाठी जळगावला रवाना करण्यात येते. रुग्णांना जळगावातील शासकीय उपचार खर्चिक आणि तापदायक पडत असल्याने रुग्ण खासगी दवाखान्याकडे वळत आहेत.रिक्त पदेवर्ग १- वैद्यकीय अधीक्षक- मंजूर १, रिक्त पद १, वैद्यकीय अधिकारी मंजूर पदे ३, रिक्त पदे ३, अधिपरिचारिका- रिक्त १, वाहनचालक रिक्त १, अशी पदे रिक्त आहेत. याशिवाय ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेपासूनच पुरूष आरोग्य सेवकाचे पद येथे भरण्यात आलेले नाही. पुरूष आरोग्य सेवकाची रुग्णालयास गरज आहे.रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आमदार हरिभाऊ जावळे आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात रुग्णालयातील समस्यांचा पाढा कथन करण्यात आला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना निवासस्थाने नाहीत. त्यामुळे आरोग्य आरोग्य कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.रुग्णालयाच्या आवारात असलेली ड्रेनेजची मुख्य पाईपलाईन चोकप झाली आहे. यामुळे रुग्णालयाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यातूनच रुग्ण व कर्मचारी यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. आवारातील कूपनलिकेतील पाण्याची पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे रुग्णालयाच्या वापरासाठी पाण्याचा तुटवडा पडत आहे. तसेच पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. अशा आशयाचे निवेदन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष सांगोळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व आमदार जावळे यांना दिले आहे.उपजिल्हा रुग्णालयाचे भिजत घोंगडेग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करावे यास शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे. मात्र उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असलेली जागा कमी पडते. परिणामी येथे उपजिल्हा रुग्णालय होईल किंवा नाही याबाबत तालुकावासीयांच्या मनात शंका आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यास ते निश्चित होऊ शकेल. रुग्णालयास लागून नगरपालिकेचा बंद पडलेला कोंडवाडा आहे. त्यात आता कोंबडीबाजार भरतो आणि त्यास लागूनच वनविभागाच्या निवासस्थानाची जागा आहे. वनविभागाची निवासस्थाने संपूर्णपणे जीर्ण झाल्याने तेथे कोणीही राहत नाही. या दोन्ही जागा आरोग्य विभागाकडे हस्तांतरण केल्यास उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. अर्थात त्यासाठी लोकप्रनिनिधींच्या इच्छाशक्तीची गरज आहे. आमदार हरिभाऊ जावळे, खासदार रक्षा खडसे यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी तालुकावासीयांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Healthआरोग्यYawalयावल