शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

ताटातील वांगे शेताच्या बांधावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:25 IST

भडगाव तालुक्यात वांग्याचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात

ठळक मुद्दे४ ते ५ रुपये किलो मिळतोय वांग्यांना भावउत्पादन खर्च व विक्रीच्या रकमेत मोठी तफावतवांग्यांवर किडीचा प्रार्दुभाव झाल्याने होतेय नुकसान

अशोक परदेशी / आॅनलाईन लोकमतभडगाव, दि.३ : वांग्याच्या दरात होणारी घसरण, शेत मजुरांची टंचाई आणि औषधांची फवारणी करून देखील किडीचा होणारा प्रार्दुभाव या तिहेरी संकटामुळे भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली वांगी बांधावर फेकण्यास सुरुवात केली आहे. या संकटामुळे पहिल्यांदाच नांगर फिरविण्याची नामुष्की अनेक शेतकºयांवर ओढविली आहे.भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील प्रमोद धर्मा पाटील या शेतकºयाने एक एकर वांगे पिकाची गेल्या नोव्हेंबर महिन्यात लागवड केली. रासायनिक खते, औषध फवारणी, महागडी मजुरी, भर उन्हाळ्यात जिवाचे रानं करुन मेहनतीने वांगे पिकाचा मळा फुलविला. सुरुवातीचे काही दिवस २० रुपये किलो भाव मिळाला. त्यानंतर मात्र भावात घसरण होऊन ५० ते १०० रुपये कॅरेट असा भाव आहे. ४ ते ५ रुपये प्रति किलो भाव वांग्याला मिळत आहे.वांगे तोडणीसाठी १५०० रुपये, वाहतूक ६०० रुपये येत असताना विक्रीतुन केवळ १५०० रुपये मिळत आहे. वांग्यांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. सध्या वांग्यात अळ्या तयार झाल्याने शेतकºयांकडून औषध फवारणी सुरु आहे. त्यातच वांगे पिकाला भाव नाही. मजुर वेळेवर मिळत नाही. वांगे किड औषधीचा मारा करुनही थांबत नाही. अशा तिहेरी दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकºयाला वांगे तोडून बांधावर फेकावे लागत आहे.तालुक्यातील टोणगाव शिवारातील इंदल लालचंद परदेशी व संजय लालचंद परदेशी यांनी एक एकरात वांगे पिकाची लागवङ केली. मात्र उत्पन्नाचा खर्चही निघत नसल्याने त्यांनी अर्धा एकर वांगे मळयावर नांगर फिरविला आहे.

मी एक एकर वांगे पिकाची लागवड केली होती. मात्र बाजारभाव फक्त ४ ते ५ रुयये प्रति किलो भाव मिळत आहे. कमी भाव, मजुरीचे वाढलेले दर परवडत नाही. त्यामुळे वांगे पिकावर नांगर फिरविण्याच्या तयारीत आहोत.-प्रमोद धर्मा पाटील, वांगे उत्पादक शेतकरी, निंभोरा.

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगाव