शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महसूलमंत्र्यांना ३० लाख दिल्याच्या आरोपाबाबत प्रशासनाला हवा लेखी खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 13:15 IST

जळगाव : विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी महिला तहसीलदारांनी सक्तीची रजा रद्द करण्यासाठी महसूल ...

जळगाव : विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी महिला तहसीलदारांनी सक्तीची रजा रद्द करण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना ३० लाख रुपये दिल्याच्या आरोप प्रकरणी जिल्हा प्रशासनाने गुप्ता यांना नोटीस बजावून आवश्यक कागदपत्रांसह लेखी खुलासा सादर करण्याचे कळविले आहे.दीपककुमार गुप्ता यांनी सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश व काही कागदपत्रे पोस्ट केली. त्यानंतर महसूल विभागातील महिला अधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुप्ता यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या सोबतच गुप्ता यांनी एका महिला तहसीलदारांनी आपली सक्तीची रजा रद्द करण्यासाठी महसूल मंत्री बी.बी. थोरात यांना ३० लाख रुपये दिल्याची चर्चा असून हे चुकीचे असल्यास संबंधित तहसीलदारांची जिल्हा बदली करण्यात यावी, अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती.तसेच प्रशासकीय सेवेतील काही हितशत्रूंनी कागदपत्रे गुप्ता यांना उपलब्ध करून दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने फिर्यादीत केला होता. त्या कागदपत्रांचा वापर गुप्ता हे आपली बदनामी करण्यासाठी करीत असल्याचेही फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.त्यानंतर ११ आॅगस्ट रोजी गुप्ता यांना नोटीस देऊन चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे कळविले होते. त्यानुसार गुप्ता यांचा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील तसेच विकास लाडवंजारी यांनी जबाब घेतला. यामध्ये या सर्व विषयांसह महसूलमंत्री थोरात यांना ३० लाख रुपये दिल्याविषयी आपले म्हणणे लेखी सादर करा, असे सांगितले असता गुप्ता यांनी नकार देत आपण मला लेखी दिलेले नसून मी लेखी उत्तर कसे देऊ, असा प्रश्न उपस्थित केला होता.त्यानंतर गुप्ता यांना लेखी देऊन महसूलमंत्री थोरात यांना ३० लाख रुपये दिल्याच्या मजुकाराविषयी आवश्यक कागदपत्रांसह आपला लेखी खुलासा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.लेखी खुलासा सादर करण्याविषयी देण्यात आलेल्या नोटीसमध्ये कधी उपस्थित रहावे, याचा उल्लेख नसल्याने आपण आपल्या मर्जीनुसार उपस्थित रहावे का, असा सवाल गुप्ता यांनी उपस्थित केला आहे. तसा उल्लेख नसल्याने आपण आवश्यक कागदपत्रे वकिलांमार्फत तयार करून उपस्थित राहू, असे गुप्ता यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव