सर्व महिला सरपंच यांना कोरोनायोद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व वडाचे रोप भेट म्हणून देण्यात आले. तसेच महिला सरपंचांना पंचायत समितीच्या कारभाराविषयी माहिती होण्याकरिता पंचायत समितीच्या सर्व विभागांची शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
यामध्ये ग्रामपंचायत, कृषी,आरोग्य, समाज कल्याण, स्वच्छ भारत, रोजगार हमी, उमेद अभियान आदी योजनांची अधिकारी व कर्मचारी यांनी सविस्तर माहिती दिली.
तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन विजयबाबूजी दर्डा यांनी या मागील निवडणुकीत सरपंचपदाची सूत्रे हाती घेतलेल्या महिला सरपंचांना पाठवलेले अभिनंदनाचे सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन महिला सरपंचांना गौरविण्यात आले. यावेळी पाचोरा माजी नगराध्यक्षा सुनीता किशोर पाटील यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले. गाव कारभार करताना ८० टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण जर केले तर गावाचा विकास १०० टक्के होतो असे त्या म्हणाल्या. तसेच महिला सरपंचांनी पुरुषांना पुढे न करता स्वतः पुढे येऊन गावाच्या कारभारात सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज बनली आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित महिलांना वटसावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती सभापती डाॅ. अर्चना पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ यांनीदेखील आपल्या मनोगतात शासकीय योजनांची माहिती महिला सरपंचांना दिली. काही अडचण आल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पाचोरा माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील, पंचायत समितीच्या सभापती डाॅ. अर्चना पाटील, सहायक गटविकास अधिकारी संजय लखवाल, जय मातादी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विशाल पाटील, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत टी. पी. मोरे, कृषी अधिकारी बी. बी. बोरसे, वडजी उपसरपंच सुरेखा पाटील, वाडे माजी उपसरपंच उषाबाई परदेशी व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत महाले यांनी केले.
फोटो — भडगाव पंचायत समिती सभापती डाॅ. अर्चना पाटील यांच्या सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित महिला सरपंच.