शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सजावट पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:48 IST

जळगाव : लाडक्या गणरायाचे सोमवारी आगमन होत ंआहे. आठवडाभरापासून सुरु असलेले आरास सजावटीचे काम पूर्ण करण्यासाठी रविवारी दिवसभर मंडळाच्या ...

जळगाव : लाडक्या गणरायाचे सोमवारी आगमन होत ंआहे. आठवडाभरापासून सुरु असलेले आरास सजावटीचे काम पूर्ण करण्यासाठी रविवारी दिवसभर मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती. श्री गणरायाची स्थापना झाल्यानंतर शहरातील बहुतांश मंडळांतर्फे दोन ते तीन दिवसात साकारण्यात आलेले देखावे नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहेत.यदांही सार्वजनिक गणेश मंडळातर्फे धार्मिक व प्रबोधनात्मक देखाव्यांवर भर देण्यात आला आहे. आठवडाभरापासून देखाव्याचे काम करण्यात येत आहे. हे देखावे साकारण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बंगालमधून व मध्यप्रदेशातून कारागीर मागविले आहेत.या कारागिरांकडून मनासारखे देखावे साकारुन घेण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी गणेशाची स्थापना होत असल्याने, रविवारी विशेषत : नवीपेठेतील मोठ्या गणेश मंडळांचे आरास सजावटीचे काम पूर्ण करण्यासाठी सकाळपासूनच काम सुरु असलेले दिसून आले.मंडप उभारणे, स्टेज तयार करणे, विद्युत रोषणाई लावणे यासह सोमवारच्या कार्यक्रमाचे नियोजन करताना दिसून आले. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण गणेशोत्सवासाठी जोमाने तयारी करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले दिसून आले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवJalgaonजळगाव