शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काम सोडलेल्या नोकरांनी केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 11:21 IST

संशयित ‘सीसीटीव्ही’त कैद

ठळक मुद्देगुन्हा दाखल 

जळगाव : नवीपेठेत बंद खोलीचे कुलूप तोडून हॉटेलच्या दोन कामगारांनीच हॉटेलच्या वापराचे दोन सिलेंडर व १५ हजाराची रोकड असा ३४ हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. बुधवारी दुपारी २ वाजता ही चोरी झाली असून संशयित सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दोघांनी महिनाभरापूर्वीच काम सोडले आहे.पंचमुखी हनुमान परिसरातील लक्ष्मीनगर येथील रहिवासी राकेश काशिनाथ माळी यांची जुन्या बसस्थानकात हॉटेल सरकार नावाने हॉटेल आहे. तसेच क्रीडा संकुल परिसरात बाबा चायनीज, लखन चायनीस या नावाने सायंकाळी गाड्या लावून व्यवसाय करतात.चायनीजच्या गाडीवर ज्ञानेश्वर भास्कर कोळी व उत्तम पंडीत माळी हे कामाला असून ते नवीपेठेतील खोलीत राहतात.बुधवारी दुपारी ३.३० वाजता ज्ञानेश्वर अंघोळीसाठी खोलीवर गेला असता त्याला खोलीचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने याबाबत मालक राकेश माळी यांना कळविले. त्यांनी पाहणी केली असता खोलीतील ४ हजाराचे दोन सिलेंडर, लोकेश माळी याचा चॉर्जिंगला लावलेला १५ हजाराचा मोबाईल व हॉटेलच्या धंद्याचे १५ हजाराची रोकड असलेली बॅग असा ऐवज लांबविलेला दिसला.खांद्यावर नेले सिलिंडरराकेश माळी यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दुपारी ३ वाजता खोलीतून सुरुवातीला एक जण खांद्यावर सिलेंडर घेवून जातांना तर त्यापाठोपाठ दुसरा संशयित त्याच्या पाठीला रोकड असलेली बॅग व खांद्यावर सिलेंडर घेवून जाताना दिसत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेले संशयित हे राकेश माळी यांच्या हॉटेलवर महिनाभरापूर्वी कामाला होते. अमर शांताराम बारुट रा. शिवाजीनगर, मुकेश रमेश राजपूत रा. नाथवाडा, कंजरवाडा अशी त्यांची नावे आहेत. दारुचे व्यसन असल्याने दोघांना कामावरुन काढून टाकण्यात आल्याची माहिती माळी यांनी दिली. याबाबळ माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.

टॅग्स :Thiefचोर