शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावातील बेलगंगा साखर कारखान्याच्या कामगारांचा बैठकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 17:46 IST

कामगारांची पन्नास टक्के देणी मिळाल्याशिवाय बोलणी न करण्याचा व्यक्त केला निर्धार

ठळक मुद्देअंबाजी ट्रेडींग कंपनीच्या बैठकीवर कामगारांचा बहिष्कारपन्नास टक्के देणी मिळाल्याशिवाय बोलणी नाहीबेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे कुलूपही उघडू न देण्याचा निर्धार

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव: दि.१२ : बेलगंगा साखर कारखान्यात काम करणा-या ६०० पेक्षा अधिक कामगारांची एकुण ८० कोटींची थकीत देणी आहे. यातील ५० टक्के रक्कम कामगारांना मिळाल्याशिवाय कोणतीही बोलणी करणार नसल्याचा पवित्रा घेत रविवारी चित्रसेन पाटीला यांच्या अंबाजी ट्रेडींग कंपनीने आयोजित केलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.शनिवारी दुपारी दोन वाजता बेलागंगा सहकारी साखर कारखाना एम्प्लॉईज युनियनने घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी ३०० पेक्षा अधिक कामगार उपस्थित होते. बेलगंगा कारखाना विकत घेणारे भूमीपुत्र नसून व्यापारी आहेत. प्रा.फंडाची ११ कोटीची रक्कम जळगाव जिल्हा बँकेने औरंगाबाद खंडपिठात भरली. त्याच्याशी अंबाजी ट्रेडींग कंपनीचा संबंध नाही. त्यामुळे त्यांनी याचे श्रेय घेऊन नये, असे युनियनचे अध्यक्ष बापूराव शामराव पाटील यांनी मनोगतात सांगितले.कामगारांच्या थकीत देण्यांपोटी रुपयाही न भरता कारखाना खरेदी करणारे कसे काय आमच्याशी बोलणी करु शकता? असा प्रश्नही त्यांनी बैठकीत उपस्थित केला. यावर कामगारांनी रविवारी खरेदीदाºयांनी बोलविलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.कामगारांचे ११० महिन्यांचे थकीत वेतन ५० कोटी, ग्रॅच्युुईटीचे २० कोटी आणि बोनससह रजेचा पगार याचे १० कोटी असे एकुण ८० कोटी रुपये थकीत आहे. यापैकी ५० टक्के रक्कम जोपर्यत कामगारांना मिळत नाही. तोपर्यंत कारखान्याचे कुलूपही उघडू न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. प्रा.फंडाची रक्कम देखील प्रत्येक कामगाराच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी. अशीही मागणी करण्यात आली. सचिव हिमंतराव देसले यांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेChalisgaonचाळीसगाव