शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका उंबरठ्यावर असल्याने कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 01:07 IST

चाळीसगाव येथे राष्टÑवादीची बैठक : जयंत पाटील यांचे आवाहन

चाळीसगाव, जि.जळगाव : लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर असल्याने मरगळ झटकून कामाला लागा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहचवून बुथ लेव्हल पर्यंत संघटन मजबुत करा. असा सल्लाही यावेळी दिला. शनिवारी सायंकाळी सात वाजता जयंत पाटील यांनी चाळीसगाव येथील दौ-यात माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत संवाद साधला.यावेळी त्यांनी केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय, एनपीए यावर सविस्तर भाष्य नोंदविले. चाळीसगाव विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीत राजीव देशमुख यांच्या विजयासाठी संकल्प करा, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीला माजी खासदार वसंतराव मोरे, आमदार सतीश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, गुलाबराव पाटील, अरुण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला अध्यक्ष कल्पना पाटील, प्रदीप देशमुख, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प. सदस्य भूषण पाटील, अतुल देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, दिलीप रामराव चौधरी, आर.के. माळी, भोजराज पुन्शी, रामचंद्र जाधव, मंगेश पाटील, अजय पाटील, सोनाली साळुंखे, अ‍ॅड. प्रदीप आगोणे, प्रकाश सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोदींच्या कार्यपद्धतीवर सडकून टिकापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जयंत पाटील यांनी सडकून टिका केली. केंद्र सरकारचे निर्णय फसवे असून नोटबंदीमुळे देशात आर्थिक आरिष्टासह शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे पाटील यांनी सांगितले. असंघटीत कामगारांचा रोजगार गेल्याने उपासमारीचे 'बुरे दिन' त्यांच्या वाट्याला आले आहेत. राफेल विमान खरेदी संशयास्पद असून करार रद्द करुन सरकारनेच हे गूढ आणखी वाढविल्याची टिकाही त्यांनी केली. राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा देखील त्यांनी कार्यकर्त्यांसमोर वाचला.

टॅग्स :PoliticsराजकारणChalisgaonचाळीसगाव