शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
3
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
4
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
5
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
6
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
7
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
8
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
9
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
10
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
11
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
12
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
13
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
14
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
15
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
16
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
17
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
18
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
19
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक

रावेर तालुका क्रीडा संकुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 19:29 IST

गत आठ नऊ वर्षांपासून पायाउभारणी झालेले तालुका क्रीडा संकुलाचे काम रखडले आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय सुवर्णपदकासाठी गरूडझेप घेणाऱ्या खेळाडूंना क्रीडासंकूल ठरतेय दिवास्वप्नसात आठ वर्षांनंतरही मुहूर्तमेढ नाही

किरण चौधरीरावेर : खेलो इंडिया युथ चॅम्पियनशिप, राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदकांची पद तालिका पटकावणारे खेळाडू आता आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाचे ध्येय उराशी घेऊन प्रचंड जिद्द, चिकाटी, मेहनतीने गरूडझेप घेण्यासाठी रावेरच्या भूमीत कंबर कसत आहेत. गत दशकात क्रीडा क्षेत्रातील सुवर्ण युवकांनी रावेरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा डौलाने रोवला असला तरी, मात्र या आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेणाºया खेळाडूंना गत आठ नऊ वर्षांपासून पायाउभारणी झालेल्या तालुका क्रीडा संकुलावर केवळ राजकीय अनास्थेमुळे कळस चढू न शकल्याने हे क्रीडासंकूल त्यांच्याकरीता दिवास्वप्न ठरले आहे.आमदार शिरीष चौधरी यांनी उडवली झोपआमदार शिरीष चौधरी यांच्या सन २००९ ते २०१४ च्या पंचवार्षिकमध्ये हे क्रीडा संकुल मंजूर झाले. सत्तांतरानंतर त्यांची दुसरी पंचवार्षिक उजाडली तरी शेळ्यामेंढ्यांचे आश्रयस्थान ठरलेल्या अपूर्णावस्थेतील टेनिस कोर्ट व जिम्नॅशियम हॉलमध्येच दंड बैठका घालत होते. मात्र, क्रीडा दिनाच्या औचित्याने आमदार शिरीष चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा क्रीडा विभागाची झोप उडवल्याने पुन्हा त्या कामाला आजपासून केवळ झाडलोट करून गती देण्याचे काम सुरू झाले आहे.कामे अपूर्णचरावेर शहरातील उटखेडा रोडवरील तालुका क्रीडा संकुल मंजूर होऊन ८ ते ९ वर्ष लोटली असली तरी, गत सहा सात वर्षांपासून सव्वा कोटी रुपये अनुदानापैकी ९५ लाख रुपये अनुदान खर्ची पडले. त्यात एक बॅडमिंटन हॉल, जिम्नॅशियम हॉल व त्याला संलग्न चेंजिग रूमचे बांधकाम होऊन या बांधकामाची आंतर व बाह्य फिनिशिंंग बाकी आहे. त्याखेरीज क्रीडांगणात धावपट्टी व खो-खोचे क्रीडांगण तयार केले असल्याचा व नाल्याकडून भरावाला संरक्षण भिंत तथा एका कॉंक्रीट गटार बांधकाम केल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जे.व्ही.तायडे यांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या तालुका क्रीडा संकुलात एक अंदाजे दोन ते अडीच हजार चौरस फूट आकाराच्या बॅडमिंटन हॉलचे बांधकाम होऊन त्यावर गोलाकार डोम टाकण्यात आला आहे. या बॅडमिंटन हॉलच्या भिंतींना आंतर व बाह्य बाजूने प्लॅस्टर फिनिशिंग व रंगकाम बाकी असून, त्यास संलग्न चेंजिग रूममध्ये काही मजूर कुटुंंब वास्तव्यास आहेत. या ओसाड भागातील जिम्नॅशियम हॉलमध्ये मेंढपाळांनी मेंढीपालन केल्याने मलमूत्र पडल्याचे दिसत असून स्वच्छतागृह अपूर्णावस्थेत आढळून आले आहे.धावपट्टीचा मात्र कुठेही थांगपत्ता नाहीबॅडमिंटन हॉल, जिम्नॅस्टिक हॉल व चेंजिग रूम बांधकाम अपूर्णावस्थेत करण्याखेरीज धावपट्टी (रनिंग ट्रॅक) वा खो खो क्रीडांगणाचा मात्र कुठेही थांगपत्ता आढळून येत नाही. केवळ बॅडमिंटन हॉल, जिम्नॅस्टिक हॉल व चेंजिग रूम बांधकाम करण्यासह या क्रीडा संकुलाच्या आवारात असलेली छोटी टेकडी जमीनदोस्त करून तेच गौणखनिज खोलगट भागात पसरवण्यासाठी तथा एक कॉंक्रीट भिंत व गटार बांधकामावर ९५ लाखांना चुना लावण्यात आल्याची संतप्त भावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.खेलो इंडिया युथ चॅम्पियनशिप या राष्ट्रीयकृत वेटलिफ्टींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. आता कॉमनवेल्थ गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे ध्येय आहे. मात्र आंतरराष्ट्रीय सुवर्ण यशाला स्पर्श करण्यासाठी व आमच्या खेळाला पुरक व्यायाम व सरावासाठी शासनाने तातडीने जिमखाना उभारण्याची गरज आहे.-अभिषेक महाजन, वेटलिफ्टींग सुवर्णपदक विजेता, खेलो इंडिया युथ चॅम्पियनशिप, रावेरमाझी चीनमध्ये आयोजित केल्या जाणाºया वर्ल्ड कौम्बो तायक्वांडो या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या चाचणीसाठी निवड झाली आहे. मात्र रावेरला तालुका क्रीडा संकुल नसल्याने स्वामी स्पोर्ट्स क्लबमध्ये व्यायाम व सराव करतो. मात्र, राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय खेळासाठी आवश्यक असलेल्या पुरेसा सुविधा खाजगी जिमखान्यात उपलब्ध नसल्याची मोठी खंत आहे.-गोविंदा चारण, तायक्वांडो सुवर्णपदक विजेता, रावेर