शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

जळगाव : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध वाढविण्यात आला आहे. त्यानुसार प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे लागू करण्‍याचे आदेश ...

जळगाव : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध वाढविण्यात आला आहे. त्यानुसार प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे लागू करण्‍याचे आदेश दिले आहेत. त्याचे पालन करीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज करण्याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

तीन ते चार महिन्यांपासून कोरोना विषाणूने कहर केला. सद्य:स्थितीला पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे, तर मृत्यूचे प्रमाणही हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. मात्र, कोरोना संसर्ग अजूनही कायम असल्यामुळे १ ते १५ जूनपर्यंत राज्य शासनाने विशेष निर्बंध जाहीर केले आहेत. विद्यापीठात काही दिवसांपूर्वी साठ ते सत्तर कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले होते, तर पाचजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे आळीपाळीने कर्मचाऱ्यांना बोलवून विद्यापीठातील कामकाज सुरू होते. आता १५ जूनपर्यंत अधिकारी व कर्मचारी यांना दररोज कार्यालयात न बोलविता २५ टक्के याप्रमाणे आळीपाळीने बोलवून कार्यालयीन कामकाज करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळेल, अशा कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश केले आहे.

पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नका

अत्यावश्यक कामकाजाकरिता वरिष्ठांनी कार्यालयात बोलविल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये त्वरित उपस्थित राहणे अनिवार्य असेल, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्व परवानगीशिवाय त्यांचे मुख्यालय सोडू नये, अशाही सूचना देण्‍यात आल्या आहेत. तर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचेही सूचित करण्‍यात आले आहे.