शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील कार्यशाळेत झिरो पेंडन्सीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 12:19 IST

पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले मार्गदर्शन

ठळक मुद्देपुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले मार्गदर्शन झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल अभियानाचे सादरीकरणसर्व जिल्हा परिषदांपासून ते ग्रामपंचायत पातळीपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.७ : झिरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल (स्वच्छ कार्यालय व तत्पर प्रशासन) या उपक्रमामुळे प्रशासकीय कामात गती येऊन जनतेची कामे वेळेवर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा उपक्रम सामान्य माणसाला दिलासा देणारा ठरणारा आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाºयांनी कामे प्रलंबित न ठेवता कामकाज करावे, असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार १ जानेवारीपासून राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गतच्या कार्यालयांसाठी झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल या कार्यप्रणालीसाठी नाशिक विभागातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी येथील कांताई सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुख्यत्वे दळवी यांंनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेस जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरन, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, प्रांताधिकारी जलज शर्मा, उपायुक्त (आस्थापना) सुकदेव बनकर, उपायुक्त (विकास) मित्रगोत्री आदी उपस्थित होते.या वेळी दळवी म्हणाले की, झिरो पेंडन्सीची प्रमुख उद्दिष्टे ही कार्यालयातील अभिलेख व अभिलेख कक्ष अद्ययावत करणे, अनावश्यक कागदपत्रे नाश करणे, कार्यालय आणि कार्यालयाचा परिसर स्वच्छ करणे ही आहे. येत्या दोन महिन्यात राज्यातील सर्व जिल्हा परिषदांपासून ते ग्रामपंचायत पातळीपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे. पुणे विभागात हा उपक्रम यशस्वीपणे राबविला गेला असल्याचे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. तसेच कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले. सोलापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी सोलापूर जि.प.मध्ये राबविलेल्या झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल अभियानाचे सादरीकरण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी केले. कार्यशाळेस नाशिक विभागातील सर्व जिल्हा परिषदांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागप्रमुख, कक्ष अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक उपस्थित होते.