शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाईच्या कामांना अजूनही मिळाला नाही मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:19 IST

जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मनपाची बरीच यंत्रणा कोरोनाच्या उपाययोजनांवर काम करीत आहे. मात्र, कोरोनाच्या उपाययोजनांवर काम ...

जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मनपाची बरीच यंत्रणा कोरोनाच्या उपाययोजनांवर काम करीत आहे. मात्र, कोरोनाच्या उपाययोजनांवर काम करत असताना मान्सूनपूर्व कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मे महिना संपण्यात आला असतानाही मनपाकडून अद्याप मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या कामांना सुरुवात झालेली नाही.दरवर्षाप्रमाणे एप्रिल महिन्यातच उपनाल्यांचा सफाईच्या कामांना सुरुवात झाली. मात्र, मुख्य पाच नाल्यांचा सफाईच्या कामांना सुरुवात झालेली नाही. गेल्या वर्षी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याच्या काठावरील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमाणावर गेल्याचे प्रकार घडले होते.यंदा अजून मनपाने याबाबत कोणतेही नियोजन आखले नसून मान्सून वेळेआधीच जर दाखल झाला. तर शहरात नालेसफाईच्या अभावामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यातच मान्सूनपूर्व पावसातदेखील नाल्यांना पूर येण्याची शक्यता असते.मात्र, महानगरपालिकेने अद्याप नियोजन न केल्याने कोरोनासोबतच पुराच्या समस्येलादेखील जळगावकराना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.नाल्यालगतच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्षशहरातील मुख्य पाच नाल्यांलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. पावसाळ्यात या नाल्यांना पुर आल्यास अतिक्रमित घरांमध्ये पुराचे पाणी जाण्याची भीती असते. दरवर्षी मनपाकडून या अतिक्रमणधारकांना नोटीस दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही. यंदातर मनपाने नोटीस देखील बजावलेली नाही. तसेच नाल्यांलगत संरक्षण भिंतीचे कामेही ठप्प आहेत. यासह जिर्ण इमारतीचे सर्वेक्षणही अद्याप झालेले नाही.मुख्य पाच तर ६७ उपनालेशहराच्या मुख्य परिसरातून लेंडी नाला जात असतो तर गणेश कॉलनी, मू.जे.महाविद्यालय, प्रेमनगर, भोईटेनगर परिसरातून दुसरा नाला जातो. तसेच पिंप्राळा व इतर भागातून ५ प्रमुख नाले वाहतात. तसेच शहरातील इतर प्रभागातून ६७ उपनाले वाहतात. शहरात दरवर्षी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शहरातील सखल भागात पाणी साचते. नाल्याला पाणी आल्याने गटारी तुंबतात व शहर जलमय होते. दरवर्षी मान्सूनच्या आधी आरोग्य आणि बांधकाम विभागाकडून २२ दिवसांचा कार्यक्रम आखला जातो. त्यानुसार जेसीबीच्या साहाय्याने प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येत असते. मात्र, यंदा अद्यापही सुरुवात झालेली नाही. कोरोनाचे संकट मोठे असले तरी मान्सूनपूर्व कामांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.नाले झाले ओव्हरफ्लोशहरात एकूूण पाच मोठे नाले आहेत. यामध्ये राष्टÑीय महामार्ग ते नेरी नाका स्मशान भूमी ते मन्यारवाडा पुलापर्यंच्या मुख्य लेंडी नाला आहे. या नाल्यात सध्यस्थितीत दोन्ही बाजूला मोठमोठी झुडुपे व गवत वाढले आहे. शिवाजी उद्यान स्मशान भूमी, मेहरूण एम.डी.एस. कॉलनी भागातील नाल्यांमध्येही मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. ६७ उपनाल्यांची सफाई सध्यस्थिती सुरु असली तरी मनपाचे कर्मचारी संख्या कमी असल्याने ही सफाई अत्यंत संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, मुख्य नाल्यांचा सफाईसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून विदा प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी अजूनही निविदा उघडण्यात आलेली नाही.

टॅग्स :Municipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादJalgaonजळगाव