भुसावळ : शहराजवळ सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरण कामाला अत्यंत वेगाने सुरुवात झाली होती. मात्र लॉकडाऊननंतर कामाला तब्बल २२ दिवस ब्रेक लागला होता. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनंतर साकेगाव जवळील वाघुर नदीच्या नवीन पुलाच्या कामाला प्रारंभ झाला आहे.पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये साकेगाव जवळील वाघुर नदी वरील पुलाचे ८० टक्के काम झाले होते. व एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता परंतु लॉकडाऊन'मुळे पुलाचे कार्यही बंद पडले होते. पुलाचे कार्य पावसाळ्यापूर्वी व्हावे याकरिता 'नही' ने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना कामाची परवानगी मिळावी याकरता पत्रव्यवहार केला होता. यानुसार जिल्हाधिकारी यांनी पुलाच्या कामाकरिता परवानगी दिली असल्याचे पूल कार्याचे प्रोजेक्ट हेड अनिल कुमार यांनी सांगितले.३० कामगार वैद्यकीय तपासणीनंतर कामावरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काम बंद असताना पुलाच्या अत्यंत महत्त्वाच्या कामाला परवानगी देण्यात आली. मात्र यामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होऊ नये याकरिता फक्त ३० कर्मचाऱ्यांना पुलाच्या कायार्साठी परवानगी देण्यात आली असून ५ मजुरांच्या सहा तुकड्या तयार करण्यात आल्या असून प्रत्येक कर्मचाºयाची एका तासानंतर सॅनिटाइजर करण्याची व्यवस्था करण्यात आली असून दर दोन तासानंतर प्रत्येकाच्या शरीराचे तापमान ही तपासण्यात येते.
लॉकडाऊनमध्ये महामार्गावरील काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 20:37 IST