शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पर्यावरण क्षेत्रात महिलांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:16 IST

-शिल्पा गाडगीळ

प्राचीन ग्रंथ आणि भारतीय संविधान यांचा पर्यावरण संरक्षण दृष्टीकोन विसरून आपण स्वाथार्साठी निसर्ग ओरबाडत आहोत. संपूर्ण विश्वात जीवसृष्टी असणारा एकुलता एक ग्रह म्हणजे पृथ्वी हा होय. या पृथ्वीला वाचविण्यासाठी जगभरातील सुजाण नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.यांत अभिमानाची गोष्ट म्हणजे पर्यावरण रक्षण व संवर्धनात भारतीय महिला अग्रेसर आहेत. याचे आदर्श उदाहरण म्हणजे सन १७३० चे चिपको आंदोलन होय. जोधपुरच्या महाराजांचा महाल बांधण्यासाठी जंगलातील झाडे तोडण्यास आलेल्या सैन्यास खिजडी गावातील अमृतादेवी या महिलेने कडाडून विरोध करतांना तिला व सोबतच्या ६३ लोकांना जीव गमवावा लागला.यातूनच चिपको आंदोलनाची मुहूर्त मेढ रचली गेली.१९७४ मध्ये शासनाने चामोली जिल्ह्यात जंगलतोडीला सुरवात केली होती तेंव्हा तेथील रैणी गावातील गौरादेवी या महिलेनी ‘जंगल म्हणजे आमचे माहेर, ते तोडू देणार नाही’ असे ठणकावून सांगत अन्य महिलांना सोबत घेऊन चिपको आंदोलन केले आणि वृक्षतोड थांबवली. १९७७ मध्ये अडवाणी गावातील बचनीदेवी या महिलेने याच आंदोलनाचा पवित्रा घेत वृक्षतोड थांबवली. चिपको आंदोलनाचे हे लोण सर्व भारतभर पसरले. दक्षिण भारतातही जंगलतोडीस विरोध करण्यासाठी १९८३ मध्ये कर्नाटकातील उत्तर कन्नड भागात असेच ‘अप्पिको आंदोलन’ करण्यात आले. अशा कितीतरी महिला आहेत ज्या वेगवेगळ्या पातळीवर पर्यावरण रक्षणाचे काम करीत आहेत जसे उदयपुर जवळील रेताड प्रदेशाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी झटणारी ‘सेवामंडल’ ही महिलांची संस्था, सायलेंट व्हॅली बचाव आंदोलनातील महिला, सरदार धरण विस्थापितांसाठी लढणाऱ्या मेधा पाटकर,चीनमधील मेई नेग, केनियातील वानगेरी मथाई, रशियाची मारिया शाराकोवा, अमेरिकेची रचेल कार्झान यांचे काम मोठे आहे-शिल्पा गाडगीळ, पक्षिमित्र , जळगाव