शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वहिनी जरा बाहेर निघा, दारावर तुमचे भावजी आले : आदेश बांदेकरांना दारात पाहून महिला थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:36 IST

छबी टिपण्यासाठी प्रचंड गर्दी

ठळक मुद्देपांडे चौकात तुफान गर्दीमुळे वाहतुक कोंडीभावजींनी केले महिलांना आपलेसे

जळगाव : वहिनी जरा घरा बाहेर निघा, दारावर तुमचे भावजी आले आहेत...असे म्हणत अभिनेता तथा शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांनी महिलांना हाक दिली. चक्क दारावर भावजींना पाहून महिला थक्क झाल्या. त्यांची छबी टिपल्यासाठी महिलावतरुणींनीप्रचंड गर्दी केली होती.शिवसेनेच्या प्रचारासाठी गुरुवारी ‘होम मिनीस्टर’ फेम आदेश बांदेकर म्हणजेच महिलांचे लाडके भावजी यांनी शहरात अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार रॅली घेतली. ज्या-ज्या ठिकाणी आदेश बांदेकरांची रॅली निघाली त्या-त्या भागात वाहतूककोंडी झाली होती. बांदेकर यांनी शहरातील विविध सहा प्रभागांमध्ये रॅली घेतली. सकाळी ९ वाजेपासून प्रचाराला सुरुवात केली. प्रभाग क्रमांक १२ व १३ मधील सेना उमेदवारांसाठी त्यांनी प्रचार केला. यावेळी माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शहर संघटक दिनेश जगताप आदी उपस्थित होते. महाबळ कॉलनी, मायादेवी नगर, शारदा कॉलनी परिसरात त्यांनी नागरिकांच्या भेटी-गाठी घेतल्या. त्यानंतर प्रभाग १४ मधील आदर्श नगर, गणपती नगर, गायत्री नगर या भागात प्रचार रॅली केली.भावजींनी केले महिलांना आपलेसेआदर्श नगर भागात प्रचार रॅली दरम्यान आदेश बांदेकर यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी प्रभागातील समस्यांसोबत इतर गोष्टी जाणून घेतल्या. प्रचार रॅली दरम्यान, काही घरे बंद असल्याचे दिसून आल्यावर आदेश बांदेकरांनी घराबाहेरून वहिनी, जरा घरा बाहेर निघा, दारावर तुमचे भावजी आले... असे म्हणत आदेश बांदेकरांनी सर्वांनाच आपलेसे केले. गणेश कॉलनी, शिव कॉलनी या भागात देखील बांदेकरांनी प्रचार रॅली घेतली.पांडे चौकात तुफान गर्दीमुळे वाहतुक कोंडीदुपारी २ वाजता आदेश बांदेकर यांनी प्रभाग ६ मधील उमेदवारांसाठी प्रचार रॅली घेतली. यावेळी विराज कावडीया यांच्या घरी आदेश बांदेकरांचे आगमन झाले. त्यांची छबीटिपण्यासाठी परिसरातील महिलांनी तुफान गर्दी केली होती. तसेच रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी देखील आपली वाहने रस्त्यावरच थांबवल्यामुळे या भागात प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती. बांदेकरांसोबत सेल्फी काढण्यासाठी युवतींनी बांदेकरांभोवती गर्दी केली.आमदारांनी केली वाहतूक सुरळीतपांडे चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे पाचोºयाचेआमदार किशोर पाटील यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी काही पदाधिकाºयांशी त्यांचे चांगलेच खटके उडाले. अनेक वाहनांना त्यांनी मार्ग मोकळा करून दिला. बांदेकर यांनी तुकारामवाडी,गणेशवाडी,साई परिसर या भागात प्रचार केला.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव