शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 21:06 IST

महिलांना समाजामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. प्रत्येक महिलेने आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे गरजेचे असून अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात पुढे येणे महत्त्वाचे आहे. पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेच्या जोखडातून मुक्तीचा लढा महिलांनी वैचारिक ताकतीने लढला पाहिजे. महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. महिलांनी शिक्षण घेतले. त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या तर सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. राज्य महिला आयोगाने तीन वर्षात अनेक राष्ट्रीय परिषदा घेऊन ग्रामीण भागापर्यंत महिलांना न्याय मिळवून दिला. तसेच महाराष्ट्र राज्य महिला अयोग हा नेहमी महिलांच्या हक्कासाठी पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.

ठळक मुद्देचाळीसगाव येथे राष्ट्रीय परिषदेत देवयानी ठाकरे यांचे प्रतिपादन‘महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण अंतर्गत महिलांमध्ये करावयाची सामाजिक व कायदेविषयक जाणीव जागृती’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद

चाळीसगाव, जि.जळगाव : महिलांना समाजामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. प्रत्येक महिलेने आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे गरजेचे असून अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात पुढे येणे महत्त्वाचे आहे. पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेच्या जोखडातून मुक्तीचा लढा महिलांनी वैचारिक ताकतीने लढला पाहिजे. महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. महिलांनी शिक्षण घेतले. त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या तर सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. राज्य महिला आयोगाने तीन वर्षात अनेक राष्ट्रीय परिषदा घेऊन ग्रामीण भागापर्यंत महिलांना न्याय मिळवून दिला. तसेच महाराष्ट्र राज्य महिला अयोग हा नेहमी महिलांच्या हक्कासाठी पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन चाळीसगाव महाविद्यालयातील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.बी.पी.आर्टस्, एस.एम.ए.सायन्स आणि के.के.सी.कॉमर्स कॉलेज व महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या सहयोगाने १४ रोजी ‘महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण अंतर्गत महिलांमध्ये करावयाची सामाजिक व कायदेविषयक जाणीव जागृती’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल होते.व्यासपीठावर जि.प.शिक्षण समिती पोपट भोळे, पं.स.सभापती स्मिता बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, शुभदा ठाकरे, माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, मिलिंद देशमुख, विनोद कोतकर, स्मिता बच्छाव, संपदा पाटील, बुदेलखंडी प्रदीप अहिरराव, क.मा.राजपूत इत्यादी उपस्थित होते. प्राचार्य मिलिंद बिल्दीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक परिषदेचे प्रमुख डॉ.डी.एस.निकुंब यांनी केले.यावेळी न्यायाधीश अनिता गिरडकर आपल्या बीज भाषणात म्हणाल्या की, महिलांसोबत पुरुषामध्येसुद्धा जागृती होणे गरजेचे आहे. समाजातील सर्वच पुरुष वाईट नाही, पण विकृत मानसिकतेच्या लोकांच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक महिलेला कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे, कारण कायद्याची व्याप्ती ही फार मोठी आहे. जेव्हा २२-२३ वर्षाचे मुलं-मुली घटस्फोटासाठी येतात, तेव्हा खूप वाईट वाटते की, कुठे भरटकतो आहे, समाज आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. तसेच त्यांनी महिलांविषयी असलेल्या विविध कायद्यांची सविस्तर माहिती सांगीतली.सूत्रसंचालन डॉ.गंगापूरकर व प्रा.रवींद्र पाटील यांनी केले तर आभार अजय काटे यांनी मानले.

टॅग्स :WomenमहिलाChalisgaonचाळीसगाव