शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात महिला शिवसैनिकांनी प्रशासनाला दिल्या बांगड्यांचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:51 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील रेशन कार्डात इतर जिल्ह्यातील आधार लिंकचा झालेला घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर थेट रेशन कार्डावर धान्य वितरीत करावे या मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलेल्या शिवसेना महिला आघाडीतर्फे मंगळवारी तहसील कार्यालयात बांगड्यांची भेट दिली

ठळक मुद्देरेशनकार्ड आधार लिंक घोळामुळे धान्य मिळेनाप्रशासनाला दिले मागण्यांचे निवेदन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील रेशन कार्डात इतर जिल्ह्यातील आधार लिंकचा झालेला घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर थेट रेशन कार्डावर धान्य वितरीत करावे या मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलेल्या शिवसेना महिला आघाडीतर्फे मंगळवारी तहसील कार्यालयात बांगड्यांची भेट दिली व निदर्शने करण्यात आली.शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील परिसरात घोषणा दिल्या.या महिलांनी अगोदर रेशनकार्ड आधार लिंक घोळाबाबत तहसिल आवारात बांगड्या फेको आंदोलनचे निवेदन दिले होते. मात्र प्रशासनावर कोणताही परिणाम न झाल्यामुळे सौभाग्याचे लेणं फेकून अपमान न करता पुरवठा विभाग व शासनाला निषेध म्हणून बांगड्यांचा आहेर भेट देत महिला आघाडीतर्फे निदर्शने आंदोलन केल्याचे सांगण्यात आले. आंदोलनात शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाठ, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, उपशहर संघटक विद्या भालशंकर, उपतालुका संघटक उज्ज्वला सोनवणे, उपतालुका संघटक सुनीता तळेले, उपशहर संघटक शारदा भोई, उपशहर संघटक यशोदा माळी, भारती हिवराळे पदाधिकारी महिलांसह वैशाली चोपडे, अलका गुरचळ, नंदिनी बोदडे, ज्योती गुरचळ, इंदुबाई तायडे, कुसुम बोदडे, जनाबाई बोदडे, संगीता रोटे, भारती तायडे, इंदूबाई बोदडे, रेखा फुलपगारे, अंजू बोदडे आदी महिला तसेच तालुकाप्रमुख छोटू भोई, गोपाळ सोनवणे, शहरप्रमुख गणेश टोंगे, गटनेता राजेंद्र हिवराळे, शहर संघटक वसंत भलभले, संतोष माळी, शुभम तळेले, भूषण वानखेडे उपस्थित होते. 

टॅग्स :agitationआंदोलनMuktainagarमुक्ताईनगर