जळगाव : दारू पिऊन नवरा, मुलगा मारहाण करतो. दारूचे व्यसन करण्यासोबतच सोरटवरही पैसे उडवतात. त्यामुळे गावातील दारू दुकाने बंद करा. गावातच काय पण गावाच्या शिवारातही दारू दुकान नको, अशी भूमिका ऐनपूर ता.रावेर येथील महिलांनी जिल्हाधिका:यांकडे मांडली. पोलीस, तहसील कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क विभाग या दारू दुकानांच्या बाजूने आहेत, असे चित्र असल्याने जिल्हाधिका:यांनीच न्याय देण्याची मागणीही केली. जिल्हाधिका:यांनी प्रतिवादी दारू दुकान मालकांच्या वकिलांना बाजू मांडण्यासाठी मंगळवार, 4 रोजी सकाळी 10 वाजेची वेळ दिली आहे. दारु पिऊन मारहाणऐनपूर ता.रावेर येथे दोन देशी दारूची दुकाने तर एक परमिट रूम आहे. त्यामुळे गावातील युवक, वयस्कर व्यक्तीही व्यवसानाधीन झाले आहेत. दारू पिऊन जवळ असलेल्या सोरटच्या अड्डय़ावर जाऊन पैसे उधळायची सवय अनेकांना लागलीय. दारू पिऊन घरातील आई, प}ी, बहीण, मुले यांना मारहाण करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. त्यामुळे गावातील महिलांनी कंटाळल्या आहेत. ही दारू दुकाने बंद करावीत, अशी मागणी करीत ऐनपूर येथील मातोश्री रमाबाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे जिल्हाधिका:यांना, राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने 7 जून 2017 रोजी चौकशीसाठी आलेल्या अधिका:यांसमोर ऐनपूर गावातील हजाराहून अधिक महिल्या जमल्या. त्यांनी स्वाक्षरी करून या दारू दुकानांना विरोध नोंदविणे सुरू केले. त्यावेळी अधिका:यांनीच सह्या पुरे झाल्या असे सांगितले. नंतर मात्र 726 महिलाच दारूबंदीची मागणी करण्यासाठी आल्या होत्या असा दावा केला. सुनावणीसाठी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित तक्रारींच्या अनुषंगाने 3 जुलै रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिका:यांसमोर सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यात दारू दुकानदारांना वकिलांमार्फत अथवा स्वत: बाजू मांडण्यास सांगण्यात आले होते. यावेळी गावातील मोठय़ा संख्येने महिलादेखील उपस्थित होत्या. या महिलांनी प्रशासकीय यंत्रणा दारू दुकानदारांच्या बाजूने काम करीत असल्याची तक्रार जिल्हाधिका:यांकडे केली. त्यावर जिल्हाधिका:यांनी मतदान घेऊन दारू दुकाने गावाबाहेर हलविली जातील, असे सांगितले. त्यावर या महिलांनी गावातच काय गावाच्या शिवारातही दारू दुकाने नको, अशी भूमिका घेतली. यावेळी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी हेदेखील उपस्थित होते.आज मतदानाची तारीख देणारदारू दुकानदारांच्यावतीने अॅड.भरत गुजर व प्रतिनिधींनी बाजू मांडली. त्यात समन्स मिळाले, पण त्यात तक्रार नक्की काय आहे? ते कळालेले नाही. तसेच ठराव कोणी केला? किती संख्येने केला? त्या महिला ग्रा.पं.च्या मतदार आहेत का? याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी त्यांना मंगळवार, 4 रोजी सकाळी 10 वाजता बाजू मांडण्याची वेळ दिली. याचवेळी दारू दुकानांविरोधात मतदान घेण्यासाठीची तारीखही दिली जाणार आहे.
ऐनपूरच्या महिलांचा ‘एल्गार’
By admin | Updated: July 4, 2017 01:11 IST