शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

उपचार मिळेना, ‘नॉन कोविड’चा मुद्दा गंभीरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:40 IST

विनवण्या करूनही रुग्णांकडे दुर्लक्ष : खाजगीत रात्री थेट नकारघंटाच

जळगाव : कोविडच्या उपचारांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत असताना नॉन कोविड रुग्णांना शासकीय पातळीवर तातडीने वेळेवर उपचार मिळतील याकडे मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे़ अन्य कुठलाही आजार असो, खाजगीत विनवण्या करूनही उपचार मिळत नसल्याचे गंभीर चित्र पुन्हा एकदा निर्माण झाले आहे़ गेल्या दोन दिवसातील दोन घटनांनी हा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आह़े त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.दोन दिवसांपूर्वी एका मुलाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे़ या आधीही अनेक घटनांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना, तशा तक्रारी समोर आलेल्या आहेत़ अशा स्थितीत नॉन कोविडसाठी आताही पुरेशी यंत्रणा उभी राहत नसून खासगी रुग्णालयांवरही रुग्णांना दाखल करून घेण्यासंदर्भात प्रशासनाने कुठल्याही सूचना किंवा नियंत्रण नसल्याचे चित्र वारंवार समोर येणाऱ्या घटनांमधून दिसते.आयुर्वेदीक महाविद्यालयात सद्य स्थितीत ८ डॉक्टर्स, दहा परिचारिका व दहा कक्षसेवक आहेत़ परिस्थतीनुसार ते वाढवता येतील,कक्ष व शस्त्रक्रिया विभागही तयार आहेत़ काही यंत्रणा व डॉक्टर्स उपलब्ध झाल्यानंतर ही सेवा सुरू होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ़ मिलिंद निकुंभ यांनी यावेळी बोलताना सांगितले.एका गृहस्थांनी कथन केलेले अनुभवआईचे वय ७४, रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक आईला घाम सुरू झाला व आई बेशुद्धावस्थेत गेली़ आईची रक्तातील साखर कमी झाली असेल आम्ही लगेच ओळखले़ मात्र, तात्काळ उपचारांची आवश्यकता होती़ आम्ही मधुमेहतज्ज्ञांकडे गेलो़ रात्रीची वेळ कंपाऊंडर बाहेर आला़ त्याने आॅक्सिमिटरने तपासले व डॉक्टर नसल्याचे सांगितले़ आम्ही विनवण्या केल्या मात्र, त्याने ऐकूण घेतले नाही़ आम्ही तेथून आकाशवाणीचौकातील अन्य एका खासगी रुग्णालयात गेलो़ त्या ठिकाणीही डॉक्टरांनी नकार दिला आम्ही तिसºया रुग्णालयात गेलो़ त्या ठिकाणी दाखल करून घेतले व दोन सलाईन लावल्या़ तेव्हा आई शुद्धीवर आली़ मात्र, डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या व न्यूमोनिया असल्याचे सांगत आम्ही या ठिकाणी दाखल करू शकत नाही, असे सांगितले़ अखेर रात्री दोन वाजता आईला डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.नॉन कोविडला १२ डॉक्टर्स हवेशासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात नॉन कोविडच्या शंभर बेडची व्यवस्था उभी करण्यात येत आहे़ मात्र, या ठिकाणी यंत्रणा व डॉक्टर्स यामुळे हे काम काहिसे थांबले आहे़ त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कॅज्युलटी कक्षात जे डॉक्टर्स कार्यरत होते़ त्यांची टीम या ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू असून १२ डॉक्टर्स उपलब्ध झाल्यास व एक्सरे, सोनोग्राफी आदी यंत्रणा सुरू झाल्यास आठवडाभरात नॉन कोविड रुग्णालय सुरू होईल, अशी माहिती आहे.लक्तरे वेशीवर टांगणारी घटनाशहरातील एका प्रौढाच्या तोंडाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती़ तशाच परिस्थितीत ते सहा तास फिरत राहिले, मात्र, त्यांच्यावर कुठेही उपचार झाले नव्हते, अखेर कोविड रुग्णालयात ड्रेसिंग करून त्यांना रात्री खासगी रुग्णालयात उपचार मिळाले होते़ या घटनेमुळे नॉन कोविडसाठी कुठलीच वैद्यकीय सेवा नाही व प्रशासनाच्या उपाययोजनाच नसल्याचा प्रत्यय या घटनेतून आला होता़ मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून काहीही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.रुग्णांनी उपचारांसाठी योग्य ठिकाणी जाणे गरजेचे आहे़ आपात्कालीन स्थितीत अतिदक्षता विभागात जाणे गरजेचे असते़ सद्य स्थितीत सर्व काळजी घेऊन सर्वच डॉक्टर्स सेवा देत आहेत़ अनेक खासगी रुग्णालयांमध्य तर बेड उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती आहे़ रुग्णालयात रुग्ण घेतला जात नाही, असे म्हणणे चुकीचे आहे़ योग्य उपचारासाठी रुग्णांनी योग्य ठिकाणी जाणे महत्त्वाचे आहे.-डॉ़ स्रेहल फेगडे, सचिव, आयएमए

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव