शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरातच विमान जमिनीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 13:22 IST

जळगावकरांनी विमानसेवेला चांगला प्रतिसाद दिल्यास एक नव्हे तर दोन फे-या सुरु करु असे आश्वासन एअर डेक्कनचे मालक गोपीनाथ यांनी जळगावात शुभारंभप्रसंगी दिले होते

विकास पाटीलमुंबई-जळगाव विमानसेवेला वर्षपूर्ण होत नाही तोच ही सेवा बंद पडली. गतवर्षी २३ डिसेंबर रोजी विमानसेवेला प्रारंभ झाला होता. हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याने केंद्र शासनाने उडान ही योजना सुरु केली. या योजनेंतर्गत राज्यातील १० शहरांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार जळगाव-मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला होता. जळगावकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण झाले मात्र नऊ महिन्यात अडथळ्यांचाच प्रवास राहिला.विमानसेवेच्या पहिल्या दिवसापासून विमानाला विलंब झाला. मुंबईहून जळगावात कधीच वेळेवर विमान पोहचले नाही. मुंबई विमानतळावर दर अर्ध्या सेकंदाला एक विमान येत असते, दिवसभरात साधारणत: ९९८ विमानांची ये-जा असते. त्यामुळे प्रादेशिक विमानसेवेसाठी लवकर स्लॉट उपलब्ध होत नसल्याने विमानाला विलंब होत असे. लहान शहरे मोठ्या शहरांशी जोडून त्यांचा विकास करण्यासाठी जर केंद्र शासनाने उडान ही योजना सुरु केली आहे तर स्लॉटची अडचण यायलाच नको. कारण ही योजना सुरु करण्यापूर्वीच या अडचणीवर मार्ग काढणे आवश्यक होते. एअर डेक्कन या विमान कंपनीचे संचालक कॅप्टन गोपीचंद यांनी सुद्धा मुंबई विमानतळावर प्रचंड वर्दळ असल्याने २५ टक्के रिजनल कनेक्टीव्हीटी ‘उडान’साठी राखीव ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी जळगावात व्यक्त केली होती. ती नऊ महिन्यात पूर्ण झाली नाही. ती झाली असती तर कदाचित विमान जळगावात वेळेवर पोहचले असते. असे असतानाही जळगावकरांनी विमानसेवा बंद पडू नये म्हणून विमानसेवेला प्रतिसाद दिला.जैन उद्योग समुहाने तर सहा महिन्यांची २५ टक्के तिकिटे आगावू घेतली. एवढेच नव्हे तर विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी सात लाखाचा धनादेश एअर डेक्कन कंपनीला दिला होता. मात्र स्लॉटची अडचण शेवटपर्यंत कायम राहिली. या व इतर काही अडचणींमुळे विमानसेवा १४ मार्चपासून तर १९ एप्रिलपर्यंत म्हणजेच ३७ दिवस बंद होती. त्यानंतर २० एप्रिलपासून सेवा पुन्हा सुरु झाली. तेव्हापासून तर सप्टेंबर अखेरपर्यंत सेवा सुरु होती. अखेर १५ दिवसांपूर्वी विमान हवेतून जमिनीवर आले. ते आता जळगावच्या दिशेने केव्हा झेप घेईल, याबाबत अनिश्चितता आहे.आमदार, खासदारांनी ही सेवा सुरळीत चालण्यासाठी पाहिजे तसे प्रयत्न नऊ महिन्यात केल्याचे दिसून आले नाही. मात्र किमान आता हीसेवा पुन्हा सुरु व्हावीयासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच ही सेवा पुन्हा सुरु होईल. जळगावकरांनी विमानसेवेला चांगला प्रतिसाद दिल्यास एक नव्हे तर दोन फे-या सुरु करु असे आश्वासन एअर डेक्कनचे मालक गोपीनाथ यांनी जळगावात शुभारंभप्रसंगी दिले होते. किमान एक विमान जरी वेळेवर सुरु ठेवले तरी पुरे होईल, असा सूर जळगावकरांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव