शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दिनकर महाले, अ़श्विनी काटोले खान्देश रनचे विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:40 IST

२१ किमी अर्धमॅरेथॉन

ठळक मुद्दे हजारो जळगावकर धावले

जळगाव : जळगाव रनर्सने आयोजित केलेल्या २१ किमी खान्देश रन या अर्धमॅरेथॉनमध्ये १८ ते ४० वयोगटात पुरूषांच्या गटात दिनकर महाले आणि महिला गटात अश्विनी काटोले यांनी विजय मिळवला. दिनकर महाले याने १ तास १३ मिनिट १२ सेंकदांची वेळ नोंदवली तर अश्विनी हीने १ तास ३९ मिनिट १७ सेकंदात शर्यत पुर्ण केली. यावेळी झालेल्या २१ किमी, १० किमी, ५ किमी आणि तीन किमी फन रनमध्ये हजारो जळगावकर धावले.सागर पार्क येथे आयोजित करण्यातआलेल्या या खान्देश रनचे उद््घाटन रविवारी सकाळी ५.३० वाजता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन,खान्देश रनचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर सतिश गुजरान यांच्या उपस्थितीत थाटात करण्यात आले.या शर्यतीच्या मार्गावर धावपटूंना प्रोत्साहित करण्यासाठी जळगाव रनर्सने विविध उपक्रम राबवले. मार्गावर काव्य रत्नावली चौकात ढोल ताशा पथक होते. तसेच नववारी साड्या नेसलेल्या महिलांनी धावपटूंसोबत काही अंतर धावून त्यांना प्रोत्साहित केले. फिनिशिंग पॉईंटवर देखील रनर्स ग्रुपचे सदस्य आणि पेसर धावपटूंना प्रोत्साहित करत होते.स्पर्धेचा निकाल - (प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे)२१ किमी - पुरूष - १८-४० वर्षे - दिनकर महाले, ( १ तास १३ मिनिटे १२ सेकंद ), सोमनाथ पावरा (१ तास १५ मिनिटे १९ सेकंद), अभिमान महाले (१ तास १७ मिनिटे १४ सेकंद), ४१ वर्षावरील - केशव सासुळदे ( १ तास ३४ मिनिटे १६ सेकंद ), किशोर धनकुले ( १ तास ३६ मिनिटे ४६ सेकंद ), डॉ. राहूल महाजन ( १ तास ४८ मिनिटे १२ सेकंद )महिला - १८ - ४० वर्षे - अश्विनी काटोले (१ तास ३९ मिनिटे १७ सेकंद), अनुषा महाजन (२ तास १५ मिनीटे १० सेकंद), कविता पाटील (२ तास १५ मिनिटे ४२ सेकंद). ४१ वर्षावरील - शारदा भोयर (१ तास ५८ मिनिटे ५२), विद्या बेंडाळे (२ तास २२ मिनिटे ३९ सेकंद)१० किमी - महिला - भगत सिंग वळवी (३२ मिनिटे ४८ सेकंद), दिनेश वसावे (३३ मिनिटे), लालसिंग पावरा (३३ मिनिटे ४०)३६ ते ५० वर्षे - पुरूष - सारंग विंचुरकर (४२ मिनिटे ४५ सेकंद), अनिल पठाडे (४४ मिनिटे ७ सेकंद) , दत्तकुमार सोनवणे(४६ मिनिटे १७ सेकंद) , ५१ किमी पेक्षा जास्त - नागुराव भोयर(४५ मिनिटे ५६ सेकंद), पंढरीनाथ चौधरी (५२ मिनिटे ४१ सेकंद), दामोदर वानखेडे (५३ मिनिटे ३ सेकंद),१० किमी महिला - १८ वर्षा वरील - अनिता भिलाला (४७ मिनिटे २३ सेकंद), उज्ज्वला बारी (४९ मिनिटे ५३ सेकंद),प्रिया पाटोळे (५० मिनिटे ५७ सेकंद), ३१ ते ४५ वर्षे - शोभा यादव (४८ मिनिटे ५८ सेकंद), वैशाली बडगुजर (१ तास २ मिनिट १४ सेकंद), अर्चना काबरा(१ तास २ मिनिटे ४७ सेकंद).४६ ते ९९ वर्षे - छाया तायडे (१ तास ४ मिनिटे ११ सेकंद), मीना डाकलिया ( १ तास ११ मिनिटे ४ सेकंद), शलाका वाघण्णा,(१ तास ११ मिनिटे ६० सेकंद)५ किमी - पुरूष - काशिराम बारेला, विनोद कोळी, सर्वेश करकरे,महिला - सिंड्रेला पवार, छाया डोळे, उल्का मोरेतीन किमी - पुरूष - चंदन महाजन, विनय चौधरी, शुभम पाटील, महिला- पिंकी कोठारी, पल्लवी पाटील, पुनम भांबरेया स्पर्धेत सर्वात कमी वयात १० किमीची शर्यत शकिला वसावे हीने पुर्ण केली. १२ वर्षांच्या शकिला हिने ३९ मिनिटात १० किमीचे अंतर पुर्ण केले तर सर्वात वयोवृद्ध धावपटू ८६ वर्षांचे डॉ. जे.एस . मुळीक ठरले. तर प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर सिकची यांनी देखील ७९ व्या वर्षी ही मॅरेथॉन पुर्ण केली.