शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महिला दक्षता समितीच्या बैठकीत वादळी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:52 IST

पारोळा येथे पोलीस व पालिका प्रशासनाने गांभिर्याने घेण्याची मागणी

पारोळा, जि.जळगाव : बाजारपेठेतील अतिक्रमण, उघड्यावर खाद्यपदार्थ व मांस विक्री यासह इतर विषयांवर महिला दक्षता समितीची सभा वादळी ठरली.पारोळा पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी दोन वाजता पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली महिला दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.बाजारपेठ ठेलागाडीधारकांचे वाढलेले अतिक्रमण यावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी, बाजारपेठेत उघड्यावर मांस विक्री केली जाते, बाजारपेठत खाद्यपदार्थ उघडे विकले जातात, त्यावर माशा बसतात यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात येऊ पाहत आहे. गेल्या ३० वर्षापूर्वी ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे ती तशीच आहे. लोकसंख्या दुपटीने वाढली पण बाजारपेठ आहे तिथेच आहे. याचा सर्वाधिक त्रास महिला वर्गाला होत आहे. आता तर राजकारण्यांनी शहाणे होऊन ही बाजारपेठ आंग्रे तलावात स्थलांतरित करावी, अशी सूचना व मागणी या बैठकीत महिला दक्षता समितीच्या प्रमुख डॉ.मंदाकिनी पाटील यांनी केली.शहरातील बालाजी मंदिराचा ध्वनिक्षेपकाचा आवाज मोठा असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होतो म्हणून मंदिर प्रशासनास आवाज कमी करण्यासाठी सूचना देण्यात यावी, असे सांगण्यात आले. राममंदिर परिसरात अवैध धंदे दारू मोठ्या प्रमाणावर विकली जाते. दारू पिऊन काही दारुडे झिंगत शिवीगाळ करतात. त्याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. ठेल्या गाडीवर सोडा बॉटलमध्येही दारू विकली जाते. पोलीस प्रशासनाने यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली,तसेच डीजेचे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी डीजेवर कायमची बंदी घालण्यात यावी, असाही विषय या बैठकीत घेण्यात आला. त्यावर कडक उपाययोजना आखली जाईल, असे पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांनी सांगितले. तसेच दर महिन्याला दोन दिवस बाजारपेठत पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन आणि महिला दक्षता समिती असे पथक फिरून या सर्व गोष्टींना चाप बसविणार आहेत.या बैठकीला महिला दक्षता समितीच्या डॉ.मंदाकिनी पाटील, विजया बंडू वाणी, संध्या पी. मुंदाणकार, शुभांगी नितीन मोहरीर, सुनंदा शेंडे आदी उपस्थित होते.या वेळी महिला दक्षता समितीची पुनर्रचना करण्यात येऊन सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्या महिला प्राधान्यक्रमाने या समितीत घेण्यात यावे, असे सर्वानुुमते ठरले. पो.काँ.सुनील पवार यांनी आभार मानले.

टॅग्स :SocialसामाजिकParolaपारोळा