शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीसाठी एक खिडकी योजना सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 12:51 IST

जळगाव : महावितरणतर्फे गणेश मंडळांना अल्पदरात वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार असून, गणेश मंडळाच्या सोयीसाठी आजपासून ‘एक खिडकी ...

जळगाव : महावितरणतर्फे गणेश मंडळांना अल्पदरात वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार असून, गणेश मंडळाच्या सोयीसाठी आजपासून ‘एक खिडकी योजना’ ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी अर्ज केल्यावर अवघ्या २४ तासात गणेश मंडळांना वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.पुढील आठवड्यात लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून, यासाठी शहरातील विविध श्री गणेश मंडळांतर्फे सजवाटीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. महावितरणतर्फे मंडळांना यंदाही सवलतीच्या दरात वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार असून विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे वीज पुरवठा घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. वीज पुरवठा घेण्यासाठी संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या परिसरातील कुठल्याही शाखा कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. तर येत्या दोन दिवसात मडळांच्या सोयीसाठी पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे ‘एक खिडकी योजना’ सुरु करण्यात येणार आहे. अर्ज केल्यानंतर २४ तासात महावितरणतर्फे संबंधित मंडळांच्या ठिकाणी तात्पुरते मीटर बसवुन देण्यात येणार आहे.अपघात विरहीत उत्सवासाठी गणेश मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शनच घ्यावे, तसेच मंडप व देखाव्यांची उभारणी करताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखण्याची खबरदारी घेण्या संदर्भात महावितरणचे कर्मचारी शहरातील विविध मंडळाच्या पदाधिकाºयांशी संवाद साधत आहेत. तसेच अनाधिकृत वीज वापरामुळे घडणाºया अनुचित घटने संबंधीत मंडळ व अनाधिकृत वीज पुरवठादारच जबाबदार राहणार असल्याच्या सूचनाही करण्यात येत आहेत.

टॅग्स :ganpatiगणपतीJalgaonजळगाव