शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पण विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाइन शिक्षण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या कोरोनाची दुसरी ही लाट आटोक्यात येताच तीन-चार महिन्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका ...

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्या कोरोनाची दुसरी ही लाट आटोक्यात येताच तीन-चार महिन्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला जात आहे. या लाटेत लहान मुलांना संसर्ग अधिक होण्याची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे शासनाकडून सुध्दा मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ यासाठी शाळा व पालकांना ऑनलाइन शिक्षणाचा आधार असणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी शाळेची घंटा वाजली नाही. नोव्हेंबर महिन्यात काही वर्गांची दारं विद्यार्थ्यांसाठी उघडली गेली. 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' या उपक्रमातंर्गत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले. यात अनेक अडचणी आल्या. नेटवर्क मिळत नसल्यामुळे काहींना ऑनलाइन शिक्षण मिळाले नाही. एवढेच नव्हे तर १ लाख विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा नसल्यामुळे त्यांना देखील शिक्षणापासून वंचित रहावे लागल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी येणार नाही व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसे पोहोचणार यासाठी शाळांकडून तयारी सुरू आहे.

==========

यंदाही टप्प्या-टप्प्याने उघडतील वर्ग?

तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी, यंदा पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू होण्याची शक्यता नाही. जर कोरोनाचा संसर्ग कमी असेल तर मागील वर्षाप्रमाणे आधी नववी ते दहावी नंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील वर्षाचा फॉम्युला वापरला जावू शकतो. दुसरीकडे शिक्षकांसमोर सुध्दा आव्हान असणार आहे. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना वेगळे काय देता येईल, व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा पूर्ण केला जाईल, हे प्रयत्न शिक्षकांना करावे लागणार असल्याचे शिक्षण तज्ज्ञांनी सांगितले.

==========

- गुरूजी लागले कामाला..., असे आहे नियोजन

काही घरांमध्ये दोन मुलं आहेत. त्यांना एकाच वेळी एकाच मोबाईलवर शिक्षण घेत येत नाही. त्यामुळे ही अडचण आपण दूर केली आहे. सकाळ आणि दुपार असे सत्र सुरू करणार आहोत. १६ जूनपासून ऑनलाइन वर्ग सुरू केले जाणार आहे. प्रत्येक दिवशी चार तासिका होतील. जर शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यास त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल.

- निलिमा चौधरी, मुख्याध्यापिका, गोदावरी सीबीएसई स्कूल

==========

शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या तर त्याप्रमाणे कार्यवाही होईल. जर सूचना नसतील तर ऑनलाइन शिक्षण सुरू राहिल. व्हॉट्सॲपद्वारे अभ्यासाला चांगला प्रतिसाद मिळतोय. सध्या शासनाचे स्वाध्याय उपक्रम बंद आहे. मात्र, शाळेकडून विविध उपक्रम राबविले जात आहे.

- माया अंबटकर, मुख्याध्यापिका, मानवसेवा विद्यालय

==================

यंदाही ऑनलाइन शिक्षण दिले जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा उघडण्याची शक्यता नाही. त्यामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल.

- गंगाराम फेगडे, मुख्याध्यापक, मनपा शाळा क्रमांक ४८, पिंप्राळा

==================

ऑनलाइन शिक्षणासाठीचे संपूर्ण नियोजन झालेले आहे. झूम, व्हाट्सअँप, गुगल मिटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाईल. कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर असल्यामुळे शासन दोन ते तीन महिने शाळा उघडणार नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरूच राहील. मात्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे पुढील नियोजन केले जाईल.

- मुस्ताक करिमी, मुख्याध्यापक, पटनी उर्दू हायस्कूल, पाळधी

==================

वर्षभरापासून मुलं घरात आहेत. ऑनलाइन शिक्षण मिळत आहे, पण मुलांना मोबाईलचे व्यसन लागत आहे. जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा सुरू झाल्यातर पाल्यास शाळेत पाठविण्यास होकार असेल. पण, शाळांनी देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

- अनिल पाटील, पालक

=================

१४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुटी आहे. अद्याप शासनाकडून कुठल्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल व शाळांना सूचना केल्या जातील.

- बी.एस.अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

================

जिल्ह्यातील शाळा संख्या

मराठी शाळा : २,६८०

इंग्रजी शाळा : ३०५

उर्दू शाळा : ३४०

हिंदी शाळा : १४

=================

शिक्षक संख्या...

मराठी शाळेतील शिक्षक : २०,०४३

इंग्रजी शाळेतील शिक्षक : ३,३०४

उर्दू शाळेतील शिक्षक : २,३९८

हिंदी शाळेतील शिक्षक : २३१