शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

खांदेपालटानंतर तरी विकासाची पहाट उजाडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 17:34 IST

महामार्गाचे ठप्प झालेले चौपदरीकरण, गाळेकराराचे भिजत घोंगडे

मिलिंद कुलकर्णीजळगाव : गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत असलेला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा खांदेपालट अखेर झाला. जिल्ह्याच्या नेतृत्वाविषयी राजकीय स्थिती अनिश्चिततेची असताना प्रशासकीय खांदेपालट झाला तरी जिल्ह्यात विकासाची पहाट उगवेल काय, याविषयी साशंकताच आहे.जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर दोन वर्षांपूर्वी ही धुरा पाटील यांच्याकडे आली. मात्र पाटील हे जिल्ह्याला पुरेसा वेळ देऊ शकले नाही. दुसरीकडे सरकारचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांची प्रतिमानिर्मिती झाली आणि राजकीय प्रभाव वाढला, परंतु पालकमंत्रिपद त्यांना सुपूर्द करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्याची राजकीय अवस्था निर्नायकी अशी आहे. त्याचा परिणाम प्रशासकीय यंत्रणेवर झाला आहे. समांतर रस्त्यासाठी झालेली दोन आंदोलने, प्रजासत्ताक दिनी झालेली विक्रमी आंदोलने, गाळेकरार, हुडको व जिल्हा बँकेचे कर्ज हे महापालिकेचे लटकलेले महत्त्वाचे प्रश्न, शेतकºयांच्या कर्जमाफीचा संभ्रम या प्रश्नांसंदर्भात दोन्ही मंत्री आणि जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर व मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. खांदेपालटानंतरही परिस्थितीत फार फरक पडेल, असे वाटत नाही. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी लोकशाही दिनाला नवी ओळख दिली. प्रभारी आयुक्त असताना गोलाणी मार्केटमध्ये स्वच्छतेचा नवा पायंडा पाडला. परंतु, मंदिर प्रकरणावरुन भाजपा आमदार सुरेश भोळे, निवेदन स्विकारण्यावरुन राष्टÑवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्याशी उडालेले खटके गाजले. मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांची अतिक्रमण हटाव मोहीम गाजली, तरी नगररचना विभागात शिस्त लावण्यात त्यांना यश आले नाही.प्रशासन ठरतेय प्रभावहिनजळगाव जिल्ह्यात राजकीय प्रभावामुळे प्रशासन प्रभावहिन ठरत आहे. यंदा प्रथमच प्रजासत्ताक दिनी विक्रमी आंदोलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाली. समांतर रस्त्यासाठी दोनदा आंदोलने झाली. वरिष्ठ अधिकाºयांमधील मतभेदांचे जाहीर प्रदर्शन मांडले गेले. मतभेद आणि मनभेदामुळे प्रशासकीय यंत्रणेवर विपरीत परिणाम झाला. नवे अधिकारी परिस्थितीत बदल करतील, अशी अपेक्षा करुया.

टॅग्स :Jalgaonजळगाव