शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

Maharashtra Election 2019 : सेनेसमोर भाजपची बंडखोरी काय चमत्कार घडविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 07:07 IST

सेनेच्या जिल्हाप्रमुखांना राष्टÑवादीचा पाठिंबा । बंडखोरांवर कारवाई होत नसल्याने सारेच चिंतेत, बसपाने उतरविले ११ उमेदवार

जळगाव जिल्ह्यात ११ जागांसाठी तब्बल १०० उमेदवार आपले भविष्य आजमावित आहेत. जिल्ह्यात भाजपचे सात तर शिवसेनेचे $४ असे युतीचे ११ उमेदवार आहेत. युती असली तरी शिवसेनेच्या उमेदवारांसमोर भाजपचे बंडखोर उमेदवार उभे आहेत. भाजपच्या या बंडखोरांमुळे शिवसेना उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. ही बंडखोरी काय चमत्कार घडविते, याकडे लक्ष लागून आहे.चार ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. तिथे भाजपचे बंडखोर समोर उभे आहेत. त्यामुळे ही बंडखोरी भाजप प्रायोजित असल्याची चर्चाही रंगू लागली आहे.मुक्ताईनगर मतदार संघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देऊन राष्टÑवादीने धमाल उडवून दिली. हे करताना आपल्या जिल्हाध्यक्षांना अर्ज मागे घ्यायला सांगण्यात आले. यावरुन हे सर्व ठरवून केल्याचे खुद्द शरद पवार यांनी सांगून एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत.राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात काट्याची ट्क्कर होत आहे. यात मतदार संघात राष्टÑवादीतर्फे संजय गरुड हे रिंगणात आहेत, तर या पक्षाचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी जैन संघाच्या एका कार्यक्रमात गिरीश महाजन यांना आपले आशिर्वाद द्यावेत, म्हणून विनंती केली. यातून आता अनेक अर्थ काढले जात आहेत.इकडे चोपडा मतदार संघात शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील आणि माजी महिला जिल्हाप्रमुख इंदिराताई पाटील यांची दोन दिवसापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध या दोघांनी प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.शिवसेनेने कारवाई केली पण पंतप्रधान मोदी यांच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या बंडखोरांकडे लक्ष देऊ नका, असे सांगत, कारवाई टाळली आहे. त्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. दुसरीकडे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना एकाचवेळी भाजप बंडखोर, राष्टÑवादी बंडखोर यांच्याशी लढत द्यावी लागत आहे.जिल्ह्यात ३४ लाख ४७ हजार १८४ मतदार आहेत. जिल्ह्यात बसपा या एकमेव पक्षाने ११ ठिकाणी ११ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्याखालोखाल राष्टÑवादी काँग्रेसचे नऊ तर काँग्रेसचे एकमेव उमेदवार नशिब आजमवित आहेत.रंगतदार लढतीमुख्यमंत्र्यांचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांच्यासमोर जामनेर मतदार संघातून राष्टÑवादी काँग्रेसचे संजय गरुड यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे महाजन हे गेल्या काही दिवसापासून जामनेरात तळ ठोकून असल्याची चर्चा राष्टÑवादी काँग्रेसकडून पसरवली जात आहे.एरंडोलमध्ये चुरशीची निवडणूक होत आहे. गेल्यावेळी इथे राष्टÑवादी काँँग्रेसचे डॉ. सतीश पाटील हे निवडून आले होते. आता तिथे त्यांची लढत शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांच्याशी होत आहे.