शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त जागांचे भिजत घोंगडे यंदा सुटणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:17 IST

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत आरटीईची आॅनलाईन प्रवेश प्रकिया

सागर दुबे़वंचित आणि गरिब कुटूंबातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, या करिता शासनाकडून शिक्षण हक्क कायद्यातंर्गत आरटीईची आॅनलाईन प्रवेश प्रकिया राबविण्यात येत असते़ मात्र, दरवर्षी मोठ्या संख्येने काही न काही कारणामुळे तसेच त्रुटींमुळे शेकडो विद्यार्थी हे प्रवेशापासून वंचित राहतात़ मागील वर्षी आरटीईच्या ११७० जागा रिक्तच राहिल्या होत्या़ त्यामुळे आरटीच्या रिक्त जागांचे भिजत घोंगडे यंदा सुटणार का ? असा सवाल उपस्थित होते़नुकतेच पुणे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून आरटीई आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले़ त्यानुसार शाळांनी केलेल्या नोंदणीनुसार त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे़ त्यानंतर २५ फेबु्रवारीपासून पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करता येणार आहे़ त्यानंतर पहिली सोडत ही १४ मार्च रोजी होणार आहे़ मात्र, यंदा तीनच फेऱ्या राबविण्यात येणार आहे़ मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी सहा फेºया राबविण्यात आल्या होत्या़ तरी देखील ११७० जागा या रिक्तच राहित्या होत्या़ यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची काही शाळांमध्ये निवड होऊनही त्यांनी प्रवेश घेतला नाही. काही विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे यंदा तीनच फेºया राबविण्यात येणार असल्यामुळे रिक्त जागांची संख्या कमी होईल का वाढेल हा प्रश्न आहे़ सहा फेºया राबवून देखील हजाराच्यावर जागा रिक्त असताना तीन फेºया राबविणे योग्य आहे का? असा सवाल शिक्षणतज्ञांकडून उपस्थिती होत आहे़ यंदा किती विद्यार्थ्यांना, किती शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही़ परंतू, आरटीईच्या रिक्त जागांची परंपरा ही यंदा मात्र मोडीस काढण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग काय प्रयत्न करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव