शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पतीचा खून करीत पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 19:16 IST

जामनेर रोडवरील स्वत:च्या घरात झोपलेल्या संदीप उत्तम पवार (२५) यांचा पत्नी कोमल (वय २१) हिने पेव्हर ब्लॉकने (फरशी) चेहरा ठेचून खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नेरी, ता. जामनेर येथे घडली.

ठळक मुद्देपेव्हर ब्लॉकने ठेचला चेहरा नेरीतील घटनेत झोपेतच पती रक्तबंबाळफिनाईल प्राशन करीत पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

नेरी, जि.जळगाव - येथील जामनेर रोडवरील स्वत:च्या घरात झोपलेल्या संदीप उत्तम पवार (२५) यांचा पत्नी कोमल (वय २१) हिने पेव्हर ब्लॉकने (फरशी) चेहरा ठेचून खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नेरी, ता. जामनेर येथे घडली. पतीचा खून करून पत्नी कोमल हिनेही फिनाइल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुनाचे कारण स्पष्ट नसून वेगवेगळ््या चर्चेला उधाण आले आहे.संदीप उत्तम पवार हा नेहमीप्रमाणे घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत शनिवारी रात्री झोपलेला होता. रविवारी सकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास पत्नी कोमल हिने पेव्हर ब्लॉक (फरशी) घेऊन तो झोपेतच असलेल्या संदीपच्या चेहऱ्यावर सपासप वार करुन चेहरा ठेचला. या घटनेत संदीप हा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला जळगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले मात्र त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.दरम्यान सदर घटनेची माहिती घरात समजताच बिथरलेल्या कोमलने घरातील फरशी पुसण्याचे फिनाइल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला घरातील काही महिलांनी पकडून ठेवले असता तिने भिंतीवर आपले डोके आपटून स्वत:ला जखमी करून घेतले. तिलादेखील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आरोपी पत्नी कोमल हिचे माहेर जवळ असलेल्या मोहाडी येथील आहे. सदर घटनेमुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावMurderखून