जळगाव : नेरी, ता.जामनेर येथे पत्नी कोमल संदीप पवार (२१) हिने पती संदीप (२६) याच्या डोक्यात फरशीचा तुकडा टाकून खून केल्याची घटना रविवारी सकाळी साडे पाच वाजता घडली. या घटनेनंतर कोमल हिनेही फिनाईल प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.डोक्याच्या मागील बाजूस जोरदार हल्ला करत चेहऱ्यावर वार केल्याने संदीपची कवटी फुटली. जिल्हा रुग्णालयात आणत असताना वाटेतच त्याने प्राण सोडले.तो मला मारुन टाकेन...कोमल हिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती धोकादायक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे तिच्या मनावर परिणाम झालेला आहे. डॉक्टर मला वाचवा...तो मला मारुन टाकेल असे ती सतत बोलत आहे. जामनेरचे निरीक्षक प्रताप इंगळे, उपनिरीक्षक विकास पाटील, अरविंद मोरे, अतुल पवार, निलेश घुगे, सचिन चौधरी व योगेश महाजन यांनी तातडीन जिल्हा रुग्णालय गाठले. कोमल हिचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती त्या अवस्थेत नसल्याने संदीप पाटील याचे शवविच्छेदन झाल्यानंतर पोलीस जामनेरला रवाना झाले.सात महिन्याची गरोदरकोमल ही सात महिन्याची गरोदर आहे. याच आठवड्यात ती माहेरी मोहाडी, ता.जामनेर येथे गेली होती. तिचे वडील विठ्ठल रामा देवरे यांचाही काही वर्षापूर्वी खून झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
पतीचा खून करुन पत्नीचे फिनाईल प्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:19 IST
जळगाव जिल्ह्यातील नेरी येथील घटना
पतीचा खून करुन पत्नीचे फिनाईल प्राशन
ठळक मुद्देकारण गुलदस्त्यात; डोक्यात टाकली फरशी