शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी, मुलगा, मुलगी व बहिणीला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 14:37 IST

मनपा निवडणुकीच्या आखाड्यात अनेक विद्यमान नगरसेवकांनी माघार घेतली असली तरी अनेकांनी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलगा किंवा मुलीला संधी दिली असल्याचे दिसून येत आहे. तीन दाम्पत्य तर आई व मुलगा, बहीण-भाऊदेखील निवडणूक रिंगणात आहेत.

ठळक मुद्देअनेक दिग्गजांनी घेतली माघारतीन दाम्पत्य निवडणूक रिंंगणातसर्वच पक्षानी दिली कुटुंबातील अनेक सदस्यांना उमेदवारी

जळगाव : मनपा निवडणुकीच्या आखाड्यात अनेक विद्यमान नगरसेवकांनी माघार घेतली असली तरी अनेकांनी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलगा किंवा मुलीला संधी दिली असल्याचे दिसून येत आहे. तीन दाम्पत्य तर आई व मुलगा, बहीण-भाऊदेखील निवडणूक रिंगणात आहेत.मनपाच्या ७५ जागांसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होणार असून, बुधवारी भाजपा, शिवसेना, राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसकडून आपल्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वच पक्षांनी एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना उमेदवारी दिली असल्याचे दिसून येत आहे.शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये तीन पती-पत्नींना संधी दिली आहे. यामध्ये श्यामकांत सोनवणे-राखी सोनवणे, नितीन बरडे - संगीता बरडे व सुनील महाजन- जयश्री महाजन या दाम्पत्यांना पक्षाने संधी दिली आहे. श्यामकांत सोनवणे हे प्रभाग ११ अ मधून तर राखी सोनवणे या प्रभाग ५ ब मधून निवडणूक लढवित आहेत. तर संगीता बरडे या १३ ड तर नितीन बरडे हे १२ अ मधून निवडणूक रिंगणात आहेत.माजी उपमहापौर सुनील महाजन व जयश्री महाजन यांनी प्रभाग १५ अ व ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.माजी नगराध्यक्ष पांडुरंग (बंडू) काळे यांची सुन दीपमाला काळे व मुलगा अमित काळे हे देखील निवडणूक रिंगणात असून, भाजपाकडून त्यांना संधी देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले माजी महापौर ललित कोल्हे व त्यांच्या आई सिंधूताई कोल्हे या यंदा भाजपाकडून प्रभाग ११ मधील क व ड मधून निवडणूक लढवित आहेत. माजी महापौर जयश्री धांडे व त्यांचा मुलगा अमोल धांडे हे देखील शिवसेनेकडून निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. तसेच माजी नगरसेवक उल्हास साबळे यांचा मुलगा स्वप्नील साबळे हे देखील प्रभाग ७ क मधून निवडणूक लढवित आहे.आमदारांच्या सौभाग्यवतींनाही उमेदवारीआमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या देखील निवडणूक रिंगणात असून त्या प्रभाग ७ अ मधून निवडणूक लढविणार आहेत. त्यासह चोपड्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या प्रभाग १९ अ मधून शिवसेनेकडून निवडणूक लढविणार आहेत.माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे यांचा मुलगा अक्षय सोनवणे, माजी महापौर अशोक सपकाळे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा राजू सपकाळे हा देखील निवडणुकीत आपले भविष्य अजमावणार आहे. तसेच विद्यमान नगरसेवक संदेश भोईटे यांच्याऐवजी त्यांची पत्नी स्रेहा भोईटे या निवडणूक लढविणार आहेत. जनक्रांतीचे नगरसेवक सुनील पाटील यांच्या ऐवजी त्यांच्या आई रेखा पाटील या निवडणूक लढविणार आहेत.अण्णा भापसे यांच्याऐवजी त्यांची पत्नी जिजाबाई भापसे, मनपा विरोधी पक्षनेते वामनराव खडकेंऐवजी त्यांचा मुलगा सुनील खडके निवडणूक लढवित आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावMuncipal Corporationनगर पालिका