शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पदाच्या लायक समजणाऱ्या खडसेंवर पोलीस ठाण्याच्या बाहेर झोपण्याची वेळ का यावी? महाजनांचा खोचक सवाल

By विजय.सैतवाल | Updated: October 15, 2022 18:13 IST

खडसेंंचे डोकं ठिकाणावर आहे की नाही हा तपासाचा भाग

जळगाव : स्वत:ला मुख्यमंत्रीपदाच्या लायक समजणाऱ्या आमदार एकनाथ खडसे यांनी विनाकारण कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करणे हे चुकीचे आहे. आता गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एवढ्या मोठ्या नेत्यावर रात्रभर पोलीस ठाण्याच्या बाहेर झोपण्याची वेळ का यावी, हे तपासले गेले पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर केली.

जळगाव जिल्हा दूध संघात सहा लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार तथा दूध संघाचे मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी दिली होती. त्यानंतर दूध संघातील मालाची चोरी झाली असल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी खडसे यांनी करीत जळगाव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत रात्रभर पोलीस ठाण्याच्या बाहेर झोपले होते.त्यानंतर शनिवार, १५ ऑक्टोबर रोजी गिरीश महाजन यांनी लोकमत कार्यालयाला भेट दिली, त्या वेळी संवाद साधताना खडसे यांच्यावर वरील टीका केली.

दिल्लीत तीन तास बसून होते खडसेएकनाथ खडसे व भाजप नेते अमित शहा यांच्या भेटी विषयीच्या मुद्यावर गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे हे दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीसाठी गेल्याचे मला समजल्यावर खडसे यांच्या स्नुषा व खासदार रक्षा खडसे यांना मी मोबाईल लावला. त्या वेळी त्या दिल्लीत होत्या व त्यांच्यासोबत एकनाथ खडसेदेखील होते. जवळपास तीन तास खडसे बसून होते, मात्र शहा यांनी खडसे यांना भेट नाकारल्याचा दावा महाजन यांनी केला. त्यांच्या घरवापसीबाबत पक्षात काहीही हालचाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खडसेंचा प्रयत्न फसलामहाजन यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना अडकविण्याच्या मुद्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकत गिरीश महाजन म्हणाले की, ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात बसून जो कट रचला गेला, तो निंदणीय असून खडसे यांच्याकडून सुरू असलेले प्रयत्न अगदी खालच्या पातळीवरचे असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसे