शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

जे ग्रामसेवक ऐकत नाहीत त्यांना का मारून टाकू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 00:58 IST

बीडीओंचे सरपंचांना उत्तर : पं.स.मध्ये ग्रामसेवकांच्या बैठकीत सदस्य अधिकाºयांमध्ये खडाजंगी, ३० ग्रामसेवकांना नोटिसा

जळगाव : ग्रामसेवकांना समज देऊन, पाठपुरावा करून कामे मार्गी लावून घेण्याचा प्रयत्न प्रशासन करते... पण जे ग्रामसेवक ऐकतच नाहीत... त्यांना आम्ही का मारून टाकायचे.. असा संताप पं.स.च्या गटविकास अधिकारी (बीडीओ) एस.पी.सोनवणे यांनी गुरुवारी ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत खेडी खुर्द येथील ग्रामसेवकाविषयी सरपंच यांनी केलेल्या तक्रारीबाबत स्पष्टीकरण देताना केला. यातच घरकुलांची अपूर्ण कामे, शौचालयांचे प्रश्न यावरून सरपंच, पं.स.चे सदस्य व गटविकास अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगीही झाली. पं.स.च्या सभागृहात घरकुले, स्वच्छतागृहे याबाबत आढावा बैठक झाली. सभापती यमुना रोटे, उपसभापती शीतल पाटील, सदस्य नंदलाल पाटील, अ‍ॅड.हर्षल चौधरी, ज्योती तुषार महाजन, संगीता चिंचोरे, खेडी खुर्दचे सरपंच कैलास चौधरी आदी उपस्थित होते. पं.स. सदस्य बीडीओंवर चिडलेसदस्य अ‍ॅड.हर्षल चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना स्वच्छतेचे मिशन केंद्रीय सरकारने हाती घेतले असून, शौचालये व घरकुले हे गंभीर विषय आहेत, असे चौधरी म्हणाले. पण गटविकास अधिकारी सोनवणे या मोबाईलमधील संदेश पाहत होत्या..., अशातच चौधरी म्हणाले, मॅडम आपण पं.स.च्या प्रमुख आहात..., पण आपल्याला मोबाईल अधिक महत्त्वाचा वाटत असेल तर हगणदरीमुक्ती, घरकुले यासंबंधी कसे यश मिळेल, असा सवाल चौधरींनी केला. त्यानंतर बीडीओ सोनवणे यांनी लागलीच मोबाईलमधील लक्ष दूर केले. सरपंच चौधरी संतापलेअ‍ॅड.चौधरी यांचे मनोगत आटोपल्यानंतर लागलीच खेडी खुर्द ता.जळगाव येथील सरपंच कैलास चौधरी यांनी आपल्या गावासंबंधी प्रशासनाची चालढकल वृत्ती असल्याचे सांगत चार महिन्यांपासून पं.स.मध्ये चकरा मारूनही ग्रामसेवक मिळत नाही. कामे खोळंबली..., असे सांगितले. त्यावर बीडीओ सोनवणे यांनी आम्ही ग्रामसेवक दिला होता... असे म्हटले. त्यावर चौधरी म्हणाले, ग्रामसेवक दिला, पण तो एवढा तर्रर्र होता की, त्याला चालता येत नव्हते. तो कसे काम करणार... बीडीओ सोनवणे यांनी लागलीच प्रत्युत्तर देत जो ग्रामसेवक दिला होता तो दुसºया गावात चांगले काम करायचा... तुमच्याच गावात कसा काम करीत नव्हता, असा प्रश्न सरपंच चौधरींना केला. त्यावर चौधरी यांनी आपण ग्रामसेवकांबाबत सारवासारव करू नका... त्यांना कामाला लावा... ज्या ग्रामसेवकाची नियुक्ती खेडी खुर्दला केली ते आजही या आढावा बैठकीत आले नाही... त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवालही चौधरी यांनी केला. त्यावर प्रशासन ग्रामसेवकांकडून कामे करून घेण्याचा प्रयत्न करते, पण जे ऐकतच नाहीत त्यांना मारून टाकू का, असा संताप नंतर बीडीओ सोनवणे यांनी केला. तर सीईओंकडे तक्रारअनेक घरकूल लाभार्थींना पहिला हप्ता मिळाला. नंतर दुसरा, अनेकांना तिसरा हप्ता मिळाला नाही. यासंबंधी अशीच दिरंगाई सुरू राहिली तर संबंधित लाभार्थींना सोबत घेऊन सीईओ कार्यालयात तक्रार केली जाईल, अशी ताकीद ग्रामसेवकांना देण्यात आली. वाद वगैरे झाला नाही, पण खेडी खुर्दचे ग्रामसेवक दारू पिऊन यायचे, अशी सरपंचांची तक्रार होती. ते दारू पीत असतील तर त्यांना माझ्याकडे त्या स्थितीत आणा, त्यांची वैद्यकीय तपासणी करू. मग कारवाई होईल. पण सरपंच माझे काहीही ऐकून घेत नव्हते. त्यांनी माझ्यावर तुम्ही ग्रामसेवकाचा अर्धा पगार घेतात, असा आरोपही केला. मग  माझा संयम सुटला. कामे व्हावीत, असाच माझा उद्देश आहे. -एस.पी.सोनवणे, गटविकास अधिकारी, पं.स., जळगाव

ममुराबादेत कोट्यवधी खर्चूनही दूषित पाणीममुराबाद येथे कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी योजना राबविली, पण तिला गळती आहे. अनेक ठिकाणी दूषित पाणी येते. शुद्धीकरण प्रकल्प व्यवस्थित नाही, अशी तक्रार सदस्या ज्योती महाजन यांनी केली. यावर ग्रामसेवक यांनी आपल्याला माहिती नाही, असे उत्तर दिले. त्यावर ग्रामसेवक सर्व बिले तयार करतात... योजनेबाबतच्या वित्तीय व्यवहारांची माहिती ग्रामसेवकाला असते, मग खराब पाण्याबाबत कशी माहिती देता येत नाही, असा प्रश्न इतर सदस्यांनी केला. गावात दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी सूचना सदस्यांनी  दिली. फक्त १७ ग्रामसेवक उपस्थित, अनुपस्थितांना नोटिसाया आढावा बैठकीला फक्त १७ ग्रामसेवक उपस्थित होते. इतर ३० ग्रामसेवक अनुपस्थित राहीले. अनुपस्थित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याचा निर्णय घेतला. खेडी खुर्दला तातडीने ग्रामसेवकाची नियुक्तीखेडी खुर्द येथील ग्रा.पं.साठी लागलीच सायंकाळी धीरज सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. सरपंचांसोबत घेणार बैठकपं.स.व तालुक्यातील सर्व सरपंच यांच्यासोबत पुढे स्वतंत्र बैठक घेतली जाईल. प्रशासनातील अधिकाºयांना त्यासाठी बोलावू, असा निर्णय सदस्यांनी घेतला.