शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांसाठी शहर वेठीस का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 13:26 IST

जळगाव महापालिका आर्थिक संकटातून जात आहे. हुडकोने मनपाचे बँक खाती देखील सील केली होती. मनपाने हुडकोकडून घेतलेल्या १४१ कोटी ...

जळगाव महापालिका आर्थिक संकटातून जात आहे. हुडकोने मनपाचे बँक खाती देखील सील केली होती. मनपाने हुडकोकडून घेतलेल्या १४१ कोटी रुपयांच्या बदल्यात आतापर्यंत ३६३ कोटी रुपये भरले आहेत. विशेष म्हणजे हुडकोकडून कर्ज घेताना मनपाने राज्यसरकारला जामीन धरले आहे. कोणत्याही बॅँकेचे कर्ज घेतल्यानंतर जामीनदारालाही दोषी धरले जाते. मात्र, हुडकोने याबाबत राज्य सरकारला दोषी न धरता थेट मनपालाच दोषी धरून मनपाचे खाती सील केली आहेत. हुडकोचे कर्ज फेडण्यासाठी मनपाला गाळेधारकांकडे असलेले थकीत भाडे वसुल केल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो. मात्र, काही ठराविक राजकारण्यांमुळे ही कारवाई केली जात नाही. मनपाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मनपाविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यास कोणीही का तयार होत नाही. मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळ्यांचा लिलाव झाल्यास मनपाचे सर्व प्रश्न निकाली लागू शकतात. या लिलावातून मनपाने हुडकोकडून घेतलेल्या कर्जापेक्षा तीनपट जास्तीची रक्कम मिळू शकते. यातून हुडकोसह जिल्हा बॅँक, जीवन विमा, सहकारी पतसंस्थाचे सर्व कर्ज फेडले जावू शकते. त्यामुळे मनपा प्रशासनाने शहरातील पाच लाख नागरिकांच्या सुविधांचा विचार करून गाळे कारवाई करून मनपाला लागलेले आर्थिक ग्रहण सोडविण्याची तयारी दर्शविली पाहिजे. मोजक्या व्यापारी वर्गासाठी संपूर्ण शहरातील नागरिक, मनपा कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे योग्य ठरणारे नाही. यासाठी आता मनपानेच काही तरी पुढाकार घेऊन मार्ग काढातला हवा.- अरुण चांगरे, अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर कॉँग्रेस

टॅग्स :Jalgaonजळगाव