शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांना स्थानकात आणण्याचा खटाटोप का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:46 IST

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना धोका : पायी जात असताना का आली नाही दया?, केवळ सीमेपर्यंत जाण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : मुंबई, सुरत इत्यादी भागातून आपापल्या राज्यात जाणाऱ्या परप्रांतीय मजूर, कामगारांच्या ट्रक पकडून गेल्या दोन दिवसांपासून जळगाव बसस्थानकात आणले जात आहे. त्यानंतर त्यांना राज्यांच्या सीमेपर्यंत सोडण्यात येत आहे. एककीडे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना बाहेर गावी जाणाºया मजुरांना बसस्थानकात आणण्याचा खटाटोप का केला जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. परिवहन आयुक्तांच्या आदेशानंतर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कार्यवाही केली जात असली तरी ज्या वेळी मजूर हजारो कि.मी. पायी जात होते, त्या वेळी दया का आली नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.राज्य शासनाने परप्रांतीयांना एस. टी. बसने त्या-त्या राज्यांच्या सीमेवर पोहचविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या करिता नुकतेच आरटीओ विभागाला रस्त्यावरुन पायी जाणारे अथवा ट्रकद्वारे जाणाºया परप्रांतीय बांधवांना बस स्थानकात आणून त्यांना बसद्वारे सीमेवर सोडण्याच्या सूचना केल्या असल्याचे परिवहन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.पायी जाताना लक्षदिले नाहीगेल्या दोन दिवसांपासून मजुरांना बसस्थानात आणण्याचे प्रकार सुरू असून मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शिवाय सोशल डिस्टंन्सिंगचे पालनही होत नाही. त्यामुळे आधीच रुग्ण संख्या वाढणाºया शहरात कोरोनाचा धोका अधिकच बळावत आहे. त्यामुळे वाहनाने जात असताना असा खटाटोप का केला जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच ज्या वेळी मजूर हजारो कि.मी. पायी जात होते, त्या वेळी अशा उपाययोजना का केल्या नाही, पदरमोड करून वाहनाने जात असताना मजुरांना अर्ध्या रस्त्यापर्यंतच का सोडले जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.सीमेवर सोडण्याला परप्रातीयांचा विरोधआरटीओ कर्मचाऱ्यांनी या ट्रक पकडून थेट बस स्थानकात आणल्या. यावेळी त्यांना आदेशानुसार एस. टी. बसने त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या परप्रांतीय बांधवांनी आम्हाला राज्य शासनाची बस नकोे, आम्ही पैसे खर्च करुन थेट गावापर्यंत जाण्यासाठी भाड्याने ट्रक केला आहे. त्यामुळे आमचा ट्रक अडवू नका, आम्हाला जाऊ द्या, अशी मागणी लाऊन धरली. यावेळी आरटीओ कर्मचाºयांनी शासनातर्फे सर्वांना गावाकडे सुखरुप पोहचविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. हे परप्रांतीय मजूर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एस. टी. बसने सीमेवर सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्यावर या परप्रातीयांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे बराच वेळा गोंधळ उडाला.वाहतूक करणारे ट्रक ताब्यातअवाजवी भाडे आकारुन परप्रांतीय बांधवांना परराज्यात घेऊन जाणाºया ट्रक चालकांविरोधात आरटीओ विभागाने कारवाई केली असून सर्व ट्रक ताब्यात घेतल्या आहेत. आतापर्यंत ७० पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली असून २२ पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. संबंधित ट्रक मालकांकडून परप्रांतीयांकडून आकारलेले भाडे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी यावेळी सांगितले.अखेर परप्रांतीय एस. टी. बसनेच गावाकडे रवानाएस.टी. महामंडळाच्या बसने सीमेवर न सोडता थेट गावापर्यंत सोडण्याच्या मागणी करणाºया परप्रांतीय बांधवांना अखेर एस.टी बसने त्यांच्या राज्यांच्याच सीमा भागात जावे लागले. आगारातील कर्मचाºयांनी त्यांची समजूत काढून सीमेवर त्यांच्या राज्यांच्या बसेस् येणार असल्याचे सांगितल्यावर सर्व परप्रांतीय बांधव बसमध्ये बसून गावाकडे रवाना झाले. रविवारी दिवसभरात या बांधवांना त्या -त्या राज्यांच्या सीमेवर सोडण्यासाठी १३ बसेस् रवाना झाल्या असल्याचे आगार व्यवस्थापक नीलेश पाटील यांनी सांगितले. यामध्ये छत्तीसगढ व झारखंडची सीमा लागणाºया नागपूर येथे ८ बसेस् रवाना झाल्या तर मध्यप्रदेशची सीमा असलेल्या रावेर येथे ४ बस व राजस्थानमधील बांधवांना श्रमिक एक्सप्रेसने जाण्यासाठी भुसावळ स्टेशनवर पाठविण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.दोन दिवसांपासून होतेय बसस्थानकात गर्दीगेल्या दोन दिवसांपासून जळगाव आरटीओ विभागातर्फे महामार्गावरुन जाणाºया परप्रांतीयांच्या ट्रक अडवून बसस्थानकात आणले जात आहे. रविवारीदेखील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाºयांनी महामार्गावरुन जाणाºया परप्रांतीयांच्या १० ट्रक अडवून त्यांना ट्रकसह बस स्थानकात आणले. विविध ट्रकमधील ७०० ते ८०० परप्रांतीय बांधवांना बस स्थानकात आणण्यात आले होते. दररोज अशी गर्दी होऊन धोका नाकारता येत नाही.परिवहन आयुक्त कार्यालयाच्या सुचनेनुसार आम्ही ट्रकने अथवा पायी चालून जे परप्रांतीय बांधव गावाकडे जात आहेत, त्यांना बस स्थानकात आणून, त्यांना जेवण देऊन एस. टी बसने त्या-त्या राज्यांच्या सीमेवर सोडत आहोत. आता पर्यंत साडेतीन हजाराहून अधिक परप्रांतीयांना सोडण्यात आले आहे. जो पर्यंत रस्त्यांवरुन चालताना मजूर दिसतील तो पर्यंत त्यांना सीमेवर सोडण्याचे काम आमचे सुरु राहील.- श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहनअधिकारी, जळगाव

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव