शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ज्याच्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात तो गुरुच होय - सुकन्या पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:21 IST

प्रत्येक जण काहीना काही शिकवृून जात असतो, स्वत:ची क्षमता ओळखून सक्षम बना

जळगाव : जीवनात प्रत्येक जण काहीतरी शिकवून जातो,ज्याच्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतात ते सर्व आपले गुरु असतात, अशा भावना मुळच्या जळगावातील हरेश्वरनगरातील रहिवासी व आयआयटी पवईच्या सुवर्णपदक विजेत्या आणि‘वर्ल्ड क्वान्ट’या बहुराष्ट्रीय कंपनीच्या उपाध्यक्षा सुकन्या विजयसिंग पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.गुरूपौर्णिमेच्या निमित्त गुरूचे जिवनातील महत्व या विषयावर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या भावना व्यक्त केल्या.त्या म्हणाल्या की, ‘ जळगाव शहरात एक सामान्य कुटुंबात वाढले. शाळेत शिकायला जाण्यापूर्वी मला आकार देणारी माझी आई माझी पहिली गुरूच होय. आयआयटी प्रवेश करू शकले याचे मूळ कारण म्हणजे शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा देत राहिली, आणि याचा पाया रचला तो चौथी स्कॉलरशिपने. आयआयटी म्हटले म्हणजे गणित आणि विज्ञान आलेच. मी शाळेत असताना े गणित शिक्षकांनी गणिताची भीती घालवली. यातून यशाचा पल्ला गाठण्याची नवीन उर्मी मिळाली, असल्याचे सुकन्या पाटील यांनी सांगितले.‘आयआयटी प्रवेशाच्या तयारीसाठी पुण्याला जाणे हा जीवनाचा टर्निंग पॉईंट बनला. तिथे माझ्या क्षमता वाढविणारे आणि मला सक्षम करणारे गुरू भेटले. आयआयटी प्रवेशाची कवाडे स्वत:च्या ज्ञानाने कशी उघडायची हे मी तिथं शिकले. आयआयटी प्रवेशाची जेईई परीक्षा गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले. देशातील अव्वल आयआयटी म्हणजे आयआयटी पवई येथे निवड झाली. एवढ्या मोठ्या संस्थेत देशभरातून आलेल्या बुद्धिमान मुलामुलींमध्ये शिकणे मला आधी कठीण वाटत होते. पण आईचे संस्कार आणि जिद्दीची शिकवण यामुळे मी तिथे टिकू शकली. ज्याच्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतात ते सर्व आपले गुरु असतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव