शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

भुसावळात गोळीबार कोणी व कोणत्या गटाकडून करण्यात आला, कारण गुलदस्त्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 17:19 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदावरून दोन गटात वाद झाला. या वादात एका गटाकडून पिस्तूलमधून गोळीबार करण्यात आला. मात्र हा गोळीबार कोणी व कोणत्या गटाकडून करण्यात आला. यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींची पोलीस कोठडी संपली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तरीही निष्पन्न झाले नाही.

ठळक मुद्देअटक करण्यात आलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगीआंबेडकर जयंती अध्यक्षपदाचा वादआरोपींकडून गावठी कट्टा हस्तगत

भुसावळ, जि.जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदावरून दोन गटात वाद झाला. या वादात एका गटाकडून पिस्तूलमधून गोळीबार करण्यात आला. मात्र हा गोळीबार कोणी व कोणत्या गटाकडून करण्यात आला. यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींची पोलीस कोठडी संपली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तरीही निष्पन्न झाले नाही.दरम्यान, तपासाधिकारी पी.एस.आय.सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला असता शुक्रवारी आरोपींना दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग डी.एम .शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आरोपींच्या चौकशीसाठी त्यांच्याकडून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिस्तूलमधून गोळ्या कोणी व कोणत्या गटाकडून झाडण्यात आल्या. त्यासंदर्भात मात्र अद्याप माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्षपदासाठी २३ रोजी बाळा सोनवणे यांची निवड झाली होती तर २४ रोजी दुसऱ्या गटाने पुन्हा बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर २५ रोजी सकाळी अडीच वाजेच्या सुमारास रेल्वे दवाखान्यामागे समता नगर जवळ, भाजपाचे नगरसेवक तथा बांधकाम समितीचे सभापती रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरासमोर दोन गटांमध्ये तुफान दगडफेक करण्यात आली, तर एका गटाकडून पिस्तूल म्हणून गोळीबार करण्यात आला. घटना घडल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलम रोहन व प्रभारी पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर गोळीबार कोणत्या गटाकडून व कोणी केला ही माहिती २४ तासांनंतर देण्यात येईल, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक मतानी यांनी दिले होती.या घटनेत भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हम्या, बाळा मोरे, बाळा सोनवणे, गिरीश तायडे व शुभम कांबळे या पाच आरोपींना अटक करण्यात आली. तर त्यानंतर अक्षय प्रताप माहुरकर (२१) रा. चक्रधरनगर यास अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला होता. योगेश मोघे, नितीन मोरे, विकास गोंड, सोनू सपकाळे, विकी मेश्राम रा. कंडारी. त्याचप्रमाणे राहुल सोनवणे, सुरेश मेढे , बाळा सोनवणे, हंसराज रवींद्र खरात, सागर रवींद्र खरात, गोलू खरात, आतिष खरात, पंकज खरात यांच्यासह इतर आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले. तपास पीएसआय सूर्यवंशी करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ