शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुठे लॉक तर कुठे अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 11:56 IST

जळगाव : लॉकडाऊनचा तिसरा दिवस शहरात संमिश्र राहिला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंग कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी धाब्यावर बसविल्याचे ...

जळगाव : लॉकडाऊनचा तिसरा दिवस शहरात संमिश्र राहिला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंग कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी धाब्यावर बसविल्याचे चित्र होते तर रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त हटल्याने वाहनेही सुसाट होती़ त्यामुळे कुठे लॉक कुठे अनलॉक अशी परिस्थिती गुरुवारी शहरात होती़कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे़ किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आलेली आहे़दुचाकीं, चार चाकींतून अत्यावश्यक सेवा वगळता प्रवासास मनाई असतानाही अनेक रस्त्यांवरून अनेक लोक डबल सीट प्रवास करताना चित्र होते़ काहींना अडवणूक झाली़ मात्र, काहींवर कारवाई न झाल्याने नियम सर्वांना सारखेच असताना अनेकांवर कारवाई होत नसल्याने संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या़ यातून तक्रारीही समोर येत आहेत़ रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या चारशे मीटर अंतरावर असलेल्या जुने भगवान नगर परिसरातील मोकळ्या जागेत, सकाळी फुटबॉल, क्रिकेटचे डाव रंगत असून रात्री या ठिकाणी चक्क बार भरलेला असतो, मात्र, पोलिसांचे याकडे लक्ष नसून एकदाही परिसरात पाहणी झाली नसल्याची तक्रार समोर आली आहे़ त्यामुळे हा कडक लॉकडाऊन केवळ नावालाच का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़दुचाकी वाहनधारकांसोबत दुजाभाव-पहिल्या दिवशी विविध चौकांमध्ये पोलीस विचारणा करून वाहने थांबवत होते़ मात्र, तिसºया दिवशी हा बंदोबस्त सैल झाल्याचे चित्र विविध चौकांमध्ये दिसत होते़ चार, चाकी, दुचाकींना कुठलीही विचारणा होत नव्हती, शिवाय काही चौकात बंदोबस्तच नव्हता़-अनेक ठिकाणी वाहनावरील डबलसीट पती- पत्नीला अडविले जात होते. काहींना सोडले जात होते. त्यामुळे हा एक प्रकारचा दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.-एकाच घरात जर पती- पत्नी शासकीय कार्यालयात नोकरीस असतील तर ते एकाच वाहनावर जाणार पण काही ठिकाणी त्यांची अडवणूक करण्यात आल्याची तक्रारी आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव