शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

धावेल, पावेल कधी हे आघाडी सरकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 16:26 IST

महाविकास आघाडी सरकारला दोन महिने होत आले तरी हे सरकार अद्याप बाल्यावस्थेत दिसून येत आहे. स्थगिती, चौकशी याच्या पलिकडे जाऊन जनतेच्या प्रश्नांविषयी सरकार गांभीर्याने काम करीत आहे, असे दिसत नाही. कर्जमाफीचा विषय त्याच श्रेणीत आहे.

ठळक मुद्दे जळगावच्या पालकमंत्र्यांनी सोमवारी नियोजन समितीची बैठक बोलावली आहे. त्यातून काही दिशा मिळेल, अशी अपेक्षा करुया. नंदुरबार व धुळ्यात निवडणुका असल्याने सगळेच ठप्प होते. के.सी.पाडवी, अब्दुल सत्तार हे अनुभवी लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी जिल्ह्यांच्या प्रश्नांमध

मिलिंद कुलकर्णीशिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश असलेले महाविकास आघाडी सरकार दोन महिन्यात स्थिरस्थावर झाले असले तरी अद्याप गती मिळाली आहे, असे जाणवत नाही. कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी करताना जिल्हा प्रशासन, जिल्हा बँका काय घोळ करतात, हे अनुभवाने शेतकऱ्यांना माहित आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांमधील अनुभवी मंत्री सरकारमध्ये असताना गतीमान प्रशासनाची अपेक्षा फोल ठरु नये.खान्देशचा विचार केला तर २० पैकी १३ आमदार हे अनुभवी आहेत. मंत्र्यांचा विचार केला तर अ‍ॅड.के.सी.पाडवी हे सर्वाधिक अनुभवी आमदार आहेत, ते जरी पहिल्यांदा मंत्री झाले असले तरी त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे विकासाचा गाडा ते सहजपणे हाकू शकतात, हा विश्वास आहे. गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. पालकमंत्री म्हणून दोघेही प्रथमच काम पाहत असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून अनुभवाचा फायदा त्यांना निश्चित होईल. मराठवाड्यातील अब्दुल सत्तार यांना धुळ्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांनी अद्याप धुळ्याला भेट दिलेली नाही. मात्र तेही अनुभवी असल्याने आणि काँग्रेस सरकारमध्ये काही काळ त्यांच्याकडे धुळ्याचे पालकमंत्रीपद होते, त्यामुळे धुळ्याची त्यांना माहिती आहे.आदिवासी विकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता ही दोन खाती खान्देशच्या मंत्र्यांकडे आहेत. दोन्ही महत्त्वपूर्ण खाती आहेत. त्याचा लाभ खान्देशला व्हायला हवा. खान्देशातील दहा तालुके हे आदिवासीबहुल आहेत. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, परंतु, त्या खºया लाभार्र्थींपर्यंत पोहोचत नाही, हा पूर्वापार अनुभव आहे. त्यामुळे स्थलांतर हा प्रश्न गंभीर बनला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा, वसतिगृहे अशा सुविधा असतानाही गळतीचे प्रमाण मोठे आहे. वनजमिनी, सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न यातही मंत्री पाडवी यांना लक्ष घालावे लागणार आहे.तीच स्थिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता या विषयाची आहे. खान्देशात शिरपूरवगळता एकाही शहरात रोज पाणीपुरवठा होत नाही. स्त्रोत, पाणी योजना, वितरणातील असमानता असे अनेक प्रश्न पालिका आणि नगरपंचायतींपुढे आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे अंमलात आणल्या जात नाही. ठेकेदारांकडून विलंब होतो आणि त्याकडे लोकप्रतिनिधी सहेतूक दुर्लक्ष करतात, हा अनुभव आहे. स्वच्छतेचा विषयदेखील तसाच आहे. स्वच्छता अभियान, स्मार्ट सिटी अशा घोषणा खूप झाल्या. अनेक शहरे आणि गावे कागदावर हगणदरीमुक्त झाली, पण वास्तव वेगळेच आहे. त्यात मंत्री पाटील यांनी कठोरपणे कार्यवाही करायला हवी, ही अपेक्षा आहे. दिखावूपणापेक्षा टिकावू कामाला प्राधान्य देण्याची गरज आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव