शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात चोरीस गेलेली वाळू रात्रीतून परत येते तेव्हा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 11:08 IST

महसूल विभागाकडे संशयाची सुई : शासनाचे २० लाखांचे नुकसान

ठळक मुद्देतक्रार होताच रात्रीतून आणून टाकली वाळूनिविदेच्या पद्धतीमुळे वाढला संशयखनिकर्म अधिकाºयांनी केला घटनास्थळाचा पंचनामा

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.८ : पिंप्राळ्यातील मयूर कॉलनी व नवसाचा गणपती मंदिर परिसरात जप्त केलेल्या ६५० ब्रास वाळूसाठ्याचा लिलाव होऊनही तो घेण्यास संबंधित मक्तेदाराने नकार दिल्यानंतर पडून असलेली वाळू चोरीस गेली. मात्र याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार प्राप्त होताच रात्रीतून या ठिकाणी काही प्रमाणात वाळू आणून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जिल्हाधिकाºयांच्या सूचनेवरून जिल्हा खनिकर्म अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन चारही वाळूसाठ्यांचा पंचनामा केला असता जेमतेम २५० ते ३०० ब्रास वाळू असल्याचे आढळून आले, त्यातही बहुतांश साठा हा ओल्या वाळूचा असल्याने रात्रीतूनच ती वाळू आणून टाकल्याचे स्पष्ट झाले. यामुळे महसूल विभागाकडे संशयाची सुई वळली आहे.निविदेच्या पद्धतीमुळे वाढला संशयया वाळूसाठ्याचा लिलाव करण्यासाठी तहसीलदारांनी वृत्तपत्रातून निविदा प्रसिद्ध करून लिलाव करणे अपेक्षित असताना केवळ तहसीलदार कार्यालयात एक नोटीस लावण्यात आली. त्यानुसार सोयीच्या माणसांनाच त्याची माहिती मिळाली व लिलावही झाला. त्यामुळे या प्रक्रियेबाबत व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला.लिलावात भाग घेणाºया व्यावसायिकाने वाळू गटांसाठीही अर्ज भरला होता. मात्र त्यासाठीची २० टक्के रक्कम आरटीजीएसने भरल्याने ती विहित वेळेपेक्षा उशिराने जमा झाल्याने त्यास अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे या व्यावसायिकाने हा लिलावाचा वाळूसाठा खरेदीस नकार दिला. त्यानंतर मात्र हा वाळूसाठा चोरीस गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.तक्रार होताच रात्रीतून आणून टाकली वाळूवाळूसाठा चोरीस गेल्याने शासनाचे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार धनराज निंबाळकर नामक व्यक्तीने बुधवारी केली. विशेष म्हणजे या तक्रारीची माहिती लगोलग वाळू चोरून नेणाºयापर्यंतही पोहोचली. संबंधिताने बुधवारी रात्रीच या साठ्याच्या ठिकाणी वाळूसाठा चोरीस गेलेला नाही, जैसे-थे आहे, असे भासविण्यासाठी सुमारे १५० ब्रास वाळू रात्रीतून या ठिकाणी आणून टाकली. तक्रारीची दखल घेऊन पंचनाम्यासाठी गेलेल्या जिल्हा खनिकर्म अधिकारी, मंडळ अधिकारी व तलाठी यांना या चारही ठिकाणांवर मिळून जेमतेम २५० ते ३०० ब्रास वाळू आढळून आल्याचे समजते. तसेच त्यातील बहुतांश वाळू ओली असल्याने रात्रीतून आणून टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव