शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'मामी सोबत का फिरतोय' विचारताच केला लोखंडी पट्टीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST

जळगाव : 'मामी सोबत का फिरत आहे? याचा जाब विचारल्याचा राग येऊन एकाने अरविंद मुकेशकुमार कुकरेजा (२९, रा़ बाबानगर, ...

जळगाव : 'मामी सोबत का फिरत आहे? याचा जाब विचारल्याचा राग येऊन एकाने अरविंद मुकेशकुमार कुकरेजा (२९, रा़ बाबानगर, सिंधी कॉलनी) या तरूणावर लोखंडी पट्टीने वार करून जखमी केले. ही घटना गुरूवारी रात्री ९ वाजता बाबा नगरात घडली. याप्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद कुकरेजा हे सिंधी कॉलनी भागातील बाबा नगरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरामागे त्यांचे मामा राहतात. गुरूवारी रात्री ९ वाजता अरविंद हे सिंधी कॉलनी उभे असताना, त्यांच्या मामी सोबत कमलेश भुदलदास चिमराणी हा दुचाकीवर सिंधी कॉलनीकडून बाबानगरकडे जात होता. नंतर कमलेश हा त्याच्या घराजवळ थांबला. अरविंद यांनी तेथे जावून कमलेश याला मामी सोबत का फिरत आहे, असा जाब विचारला. याचा राग येवून कमलेशने अरविंद यांच्या हातावर लोखंडी पट्टीने वार केला. त्यात गंभीर इजा झाल्याने हातातून रक्तस्त्राव होवू लागला. तितक्यात कमलेश याची बहिण त्याठिकाणी आली व तिनेही अरविंद याला मारहाण केली. मुलाला मारहाण होत असल्यामुळे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या कुकरेजा कुटुंबीयांना दोन्ही भाऊ, बहिणीने मारहाण केली. घटनेनंतर अरविंद याने एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. मात्र, हाताला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांना लागलीच पोलिसांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविले. उपचार घेतल्यानंतर अरविंद यांच्या फिर्यादीवरून कमलेश चिमराणी व त्याच्या बहिणीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.