शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

जळगावच्या बाजारपेठेत महिनाभरानंतर गव्हाचे भाव कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:55 IST

विजयकुमार सैतवाल, जळगाव जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी असलेली गर्दी काहीसी कमी झाली असून महिनाभरानंतर गव्हाचे भाव कमी झाले ...

विजयकुमार सैतवाल, जळगावजळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी असलेली गर्दी काहीसी कमी झाली असून महिनाभरानंतर गव्हाचे भाव कमी झाले आहे. वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी सुरू होती, तेदेखील थांबली आहे. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून सुरुवातीपासूनच त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात गेल्या महिनाभरापासून गहू व डाळीमध्ये दर आठवड्याला तेजी येत असल्याने ग्राहकांची चिंता वाढली होती. तीन आठवड्यांपूर्वी वाढलेल्या तांदळाचे भावदेखील गेल्या आठवड्यापासून स्थित आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊन कडधान्याची आवक कमी असल्याने डाळीवर परिणाम झाला व सुरुवातीपासूनच डाळींचे भाव वाढू लागले. त्यात कडधान्याच्या आयातीच्या प्रमाणावर निर्बंध येण्यासह मागणी वाढल्याने गेल्या महिनाभरापासून धान्य, डाळींचे भाव वाढत होते. मात्र आता मागणी कमी झाल्याने गव्हाचे भावदेखील कमी होत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.गेल्या आठवड्यात ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात देखील याच भावावर स्थिर आहे. उडीदाच्या डाळीच्या भावात घसरण होऊन ६२०० ते ७००० रुपये प्रती क्विंटलवरून ६४०० ते ६८०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६१०० ते ६४०० रुपये प्रती क्विंटलवर तर तसेच तूरडाळीच्या भावातदेखील २०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने घसरण होऊन ते ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटलवरून ८७०० ते ९००० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.गव्हातही घरसणवर्षभरासाठी धान्य खरेदी काहीसी कमी झाल्याने गव्हाच्या भावत ५० रुपये प्रती क्विंटलने घसरण झाली आहे. २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव २२५० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवरून २२५० ते २३५० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसीचे भाव ३७५० ते ३९५० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २३५० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.तांदुळाचे भाव स्थिरतांदुळाची आवक नसल्याने व मागणी कायम असल्याने गेल्या तीन आठवड्यापासून तांदळाच्या भावातही वाढ झाली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून हे भाव स्थिर आहे. यात चिनोर ३२०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४२०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४८०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २७०० ते २८०० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती ९००० ते १ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव