शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

काय म्हणतात रिक्षा चालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST

१) लॉकडाऊनमुळे रिक्षावर अवलंबून असणाऱ्यांना मोठा फटका बसला. जेमतेम आता व्यवहार सुरू झाला आहे, मात्र त्यात पोट भरणे शक्य ...

१) लॉकडाऊनमुळे रिक्षावर अवलंबून असणाऱ्यांना मोठा फटका बसला. जेमतेम आता व्यवहार सुरू झाला आहे, मात्र त्यात पोट भरणे शक्य नाही. पेट्रोलचे

दर भरमसाठ वाढले आहेत. ९५ रुपये लिटर पेट्रोल त्यात ऑईल १५ रुपयांचे असे ११० ते १११ रुपये लिटरमागे लागतात. दिवसभरात सहाशे रुपये कमावल्यानंतर पेट्रोल खर्च जाऊन हातात २५० ते ३५० रुपये मिळतात. दिवसा ट्रॅव्हल्स बसवर कंडक्टर म्हणून काम करावे लागते व रात्री रिक्षा व्यवसाय. त्यावरच घरखर्च भागतो. मोठी गुंतवणूक किंवा मुलांना उच्च शिक्षण देऊ शकत नाही.

-सुभाष शिवाजी पाटील, तुकारामवाडी

२) रिक्षा व्यवसायावर आता स्वत: व कुटुंबाचेही पोट भरत नाही. शहरात रिक्षांची संख्या मोठी आहे, त्यात भाडे अगदी कमी आहे. लहान शहर असल्याने धंदा

जास्त होत नाही. त्यामुळे पर्यायी व्यवसाय म्हणून केटरिंग चालकाकडे कामाला जावे लागते. तेथे ५०० ते १००० रुपये रोज मिळतो, परंतु हे कामदेखील रोज नसते. आता दुसरा पर्यायही नाही, नाईलाजाने हा व्यवसाय करावा लागत आहे.

- रवींद्र जयराम चौधरी, चंदू अण्णा नगर

३) कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने जास्त शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे सरकारी तर सोडाच पण खासगी नोकरीही करता आली नाही.

रिक्षाचा पर्याय निवडला, मात्र पेट्रोलचे भडकलेले दर व लॉकडाऊन यामुळे हा व्यवसायही संकटात आलेला आहे. त्यामुळे त्याला जोड म्हणून शेळीपालन सुरू केलेले आहे. सहा महिने, वर्षभरातून थोडाफार हातभार लागतो. त्यावरच कुटुंब चालते. दवाखाना व मुलांचे शिक्षण आले की पुन्हा अर्थचक्र बिघडते. आणखी पर्यायी व्यवसायाच्या शोधात आहोत.

-गणेश शंकर शिरसाळे, पांझरापोळ

इतर कामांशिवाय पर्याच नाही

रिक्षा व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही, घरसंसार चालविताना मोठी कसरत होते. त्यामुळे इतर जोड व्यवसाय केल्याशिवाय पर्यायच नाही. पती रिक्षा चालवून इतर वेळेत दुसरीकडे काम करतात तर महिला घरात पापड लाटणे किंवा शिलाई काम करून संसाराला हातभार लावतात. त्यामुळे महिनाभर संसाराचा गाडा चालतो.

पेट्रोल दरवाढीने मोडले कंबरडे

पेट्रोलचे दर ९५ रुपयांच्याही पुढे गेलेले आहेत. रिक्षाला एक लिटर पेट्रोलसोबत दहा ते पंधरा रुपयांचे ऑईलही टाकावे लागते. त्यामुळे हे पेट्रोल १११ रुपयांच्या घरात जाते. बँक व इतर वित्तीय संस्थांचे हप्ते, मेटेंनन्स, पोलिसांचे मेमो व इतर बाबींमुळे त्यामुळे हा व्यवसाय संकटात आलेला आहे. येत्या काही प्रवासी जास्त भाडे द्यायला तयार नाहीत, तर पोलीस एकही प्रवासी जास्त बसू देत नाहीत. कोरोनामुळे तर प्रवासी संख्येवरही मर्यादा होती.