शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात कुलरचा वापर करतांना काय काळजी घ्याल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 18:46 IST

कुलरचा वापर करीत असताना त्यात विद्युत प्रवाह येऊन अपघात होण्याची शक्यता असते. तेव्हा कुलरचा गारवा अनुभवताना विद्युत सुरक्षेबाबत दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देअर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्सचा करा वापरव्यवसायिक व्यक्तिकडूनच करा दुरूस्तीअर्थिंगसाठी थ्री पिन प्लगचा करा वापरकुलरमध्ये पाणी टाकतांना काळजी घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्ह्यात वाढलेल्या तापमानापासून बचावासाठी घरोघरी कुलर लावण्यात येत असतात. कुलरचा वापर करीत असताना त्यात विद्युत प्रवाह येऊन अपघात होण्याची शक्यता असते. तेव्हा कुलरचा गारवा अनुभवताना विद्युत सुरक्षेबाबत दक्षता घेणे महत्त्वाचे आहे.लहान मुलांना खेळण्यास मज्जाव -अनेकवेळा अपघाताच्या घटनांमध्ये कुलरच्या जवळपास खेळणाऱ्या लहान मुलांचा समावेश असतो. त्यामुळे कुलरच्या सान्निध्यात लहान मुले येणार नाहीत, अशा पध्दतीने कुलरची मांडणी करावी. कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असल्यास लहान मुलांचा हात पंख्यात जाणार नाही.पाणी टाकतांना घ्या काळजीकुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीज पुरवठा बंद करावा. कुलरमधील वीजतारांचे (वायर्सचे) आवरण सुस्थितीत असल्याची खात्री करावी. कुलरमध्ये वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच, ओल्या हाताने कधीही कुलरला स्पर्श करु नये. कुलरमधून पाण्याची गळती होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.घरातील अर्थिंगची करा तपासणी -घरातील अर्थिंग सुस्थितीत असल्याची तपासणी परवानाधारक ठेकेदाराकडूनच नियमित कालावधीत करावी. जुन्या वायरिंगची तपासणी करणे, खराब झालेली तसेच आवरणाची रोधक क्षमता कमी झालेली वायरींग तात्काळ बदलण्यात यावी.अर्थिंगसाठी थ्री पिन प्लगचा करा वापरकुलरला नेहमी थ्री पिन प्लग व सॉकेटचा वापर करावा. त्यामुळे कुलरला आर्थिंग व्यवस्थित मिळेल. विद्युतप्रवाहाची गळती झालेली असल्यास धोका टळेल. आय.एस.आय.चिन्ह आणि योग्य दजार्ची विद्युत उपकरणे वापरणे आवश्यक आहे.व्यवसायिक व्यक्तिकडूनच करा दुरूस्तीकुलरमध्ये कोणताही प्रकारचे बिघाड झाल्यास दुरूस्तीचे काम जबाबदार व्यवसायिक व्यक्तिकडून करून घ्यावे. कुलरच्या पंप दुरुस्ती करण्यापुर्वी वीज पुरवठा बंद करावा. पंपास वीज पुरवठा करणारी वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करावी.विजेचा धक्का लागल्यास काय करालएखाद्यास विजेचा धक्का बसल्यास कोरड्या लाकडाने त्या व्यक्तीस स्पर्श न करता बाजुला करावे. त्वरित कृत्रीम श्वास देत रुग्णालयात आणा. घरातील विद्युत उपकरणे तात्काळ बंद करावी.अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्सचा करा वापरप्रत्येकाने आपल्या घरात अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवणे आवश्यक आहे. वीजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तो तांत्रिकदृष्ट् या उत्तम उपाय आहे. त्यामुळे वीजेचा धक्का लागल्यास वीज प्रवाह खंडीत होऊन पुढील अनर्थ टळतात.

उन्हाळ्याच्या दिवसात कुलरचा वापर करीत असताना ग्राहकांनी विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून विद्युत अपघात टाळावे.बी.के.जनवीर, मुख्य अभियंता, वीज वितरण कंपनी, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगावelectricityवीज