शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पक्षासोबत गद्दारी करून बंडखोर आमदारांना काय मिळाले, ‘बाबाजी का ठुल्लू’; आदित्य ठाकरेंचा घणाघात

By विलास.बारी | Updated: August 20, 2022 18:11 IST

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद रॅलीच्या दुस-या टप्प्याला जळगाव जिल्ह्यातील पाचो-यापासून प्रारंभ झाला. पाचोरा येथील शिवसेनेचे माजी आमदार स्व. आर.ओ.पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत हेाते.

जळगाव : शिवसेनेत बंडखोरी करण्यासाठी बंडखोर आमदारांना तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रीपदाचे आश्वासन दिले. मात्र पक्षासोबत गद्दारी करून या बंडखोर आमदारांना काय मिळाले, तर ‘बाबाजी का ठुल्लू’, असा घणाघात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाचोरा येथील शिवसंवाद रॅलीत केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यापासून प्रारंभ झाला. पाचोरा येथील शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत हेाते.

गद्दारांनी दही हंडी फोडली मात्र मलई खाण्यासाठी -आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तात्पुरते मुख्यमंत्री असा उल्लेख करीत त्यांनी काल ५० थर लावून दहीहंडी फोडल्याच्या वक्तव्य केल्याचे सांगितले. मात्र शिवसेनेसोबत गद्दारी करून या ५० आमदारांनी मलई खाल्ली आणि जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

गद्दारांना काय मिळाले बाबाजी का ठुल्लू -शिवसेनेने सर्व आमदारांना भरभरून दिले. त्यांना फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखविण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात जे मंत्री होते त्याच बंडखोर आमदारांना या सरकारमध्ये मंत्रीपदे मिळाली. मात्र तीदेखील दुय्यम दर्जाची. आमच्याकडे असताना प्रत्येक मंत्र्याकडे वजनदार खाती होती. त्यातच उर्वरित आमदारांना काय मिळाले तर बाबाजी का ठुल्लू, असा टोला त्यांनी हाणला.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाJalgaonजळगाव