शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

बोल्ट आणि ब्रॅडमन यांच्या शेवटच्या सामन्यातील दुर्दैवी योगायोग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 18:20 IST

दोन अजोड खेळाडू...ते मैदानावर असले म्हणजे यश-अपयश, जय-पराजय हा प्रश्नच नाही. ते खेळणार हेच महत्त्वाचे. त्यांच्यासोबत खेळायला मिळणे हे आपले भाग्य आणि त्यांचा खेळ बघायला मिळण्यातच धन्यता पावणारे असंख्य....अशा या दोन्ही महान खेळाडूंच्या कारकिर्दीचा शेवट मात्र अपयशी आणि अश्रुपूर्ण व्हावा हा केवढा दुर्दैवी योगायोग!

ठळक मुद्देसर डॉन ब्रॅडमन आपली शेवटची कसोटी खेळी खेळले शनिवार, १४ आॅगस्ट १९४८ रोजीउसेन बोल्ट हा आपली शेवटची अपूर्ण सोडावी लागलेली शर्यत धावला शनिवार १२ आॅगस्ट २०१७ रोजी.सर डॉन ब्रॅडमन आणि उसेन बोल्ट हे शेवटचा सामना खेळले ते दोन्ही दिवस शनिवारच आणि तारीख १४ व १३ आॅगस्ट.फलंदाजीचा बादशहा सर डॉन ब्रॅडमन हे आपल्या शेवटच्या खेळीत भोपळासुद्धा न फोडता शून्यावर बाद झाले.ज्या ट्रॅकवर आयुष्यभर उसेन बोल्ट वाºयाच्या वेगाने धावला त्याच ट्रॅकवर शेवटच्या शर्यतीत त्याला दुखण्यापायी वेदनेने विव्हळत डोळ्यात अ़श्रू घेऊन कोसळण्याची वेळ आली.

- ललित झांबरे

जळगाव, दि.१४ - दोन अजोड खेळाडू...ते मैदानावर असले म्हणजे यश-अपयश, जय-पराजय हा प्रश्नच नाही. ते खेळणार हेच महत्त्वाचे. त्यांच्यासोबत खेळायला मिळणे हे आपले भाग्य आणि त्यांचा खेळ बघायला मिळण्यातच धन्यता पावणारे असंख्य....अशा या दोन्ही महान खेळाडूंच्या कारकिर्दीचा शेवट मात्र अपयशी आणि अश्रुपूर्ण व्हावा हा केवढा दुर्दैवी योगायोग! त्यांच्यासह चाहत्यांसाठीही असा निरोपाचा नकोसा क्षण एकाच शहरात यावा आणि त्याची तारीखही जवळपास सारखीच असावी हा आणखीन एक दुर्दैवी योगायोग!एव्हाना लक्षात आलंच असेल की वेगाचा बादशहा उसेन बोल्ट आणि क्रिकेटचे शहेनशहा डॉन ब्रॅडमन यांच्याबद्दल ही प्रस्तावना आहे. दोघांचीही निवृत्ती लंडन शहरातच घडली आणि तारीख पहा...सर डॉन ब्रॅडमन आपली शेवटची कसोटी खेळी खेळले शनिवार, १४ आॅगस्ट १९४८ रोजी आणि उसेन बोल्ट आपली शेवटची अपूर्ण सोडावी लागलेली शर्यत धावला शनिवार १२ आॅगस्ट २०१७ रोजी. दोन्ही वेळा दिवस शनिवारच आणि तारीख १४ व  १२ आॅगस्ट. काय विलक्षण योगायोग आहे हा!

हे योगायोग एवढ्यावरच थांबत नाहीत तर आणखीनही आहे. सर डॉन ब्रॅडमन यांना कसोटी धावांची सरासरी १०० कायम राखण्यासाठी १९४८ च्या ओव्हल कसोटीत फक्त चार धावांची गरज होती. त्या मालिकेआधीच त्यांनी आपली ही शेवटची मालिका असेल असे जाहीर केलेले असल्याने  त्यांचा निरोपाचा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांनी तोबा गर्दी केलेली होती. आणि १४ आॅगस्ट १९४८ रोजी संध्याकाळी सर डॉन जेंव्हा फलंदाजीला उतरले तेंव्हा त्यांना उपस्थित हजारोंनी उभे रहात टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली. मैदानावर प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या खेळाडूंनीसुद्धा ‘थ्री चिअर्स’ करून त्यांचे स्वागत केले. असं म्हणतात की, सर डॉन या स्वागताने एवढे भावनावश झाले की त्यांच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. त्याच स्थितीत त्यांनी फलंदाजीचा पवित्रा घेतला आणि दुर्दैवाने दुस-याच चेंडूंवर एरिक होलीसने एका गुगलीवर त्यांचा चक्क त्रिफळा उडवला. फलंदाजीचा बादशहा आपल्या शेवटच्या खेळीत भोपळासुद्धा न फोडता शून्यावर बाद झाला आणि सर्व स्तंभित झाले. 

त्यावेळी समालोचन करणा-या जॉन अरलॉट यांनी या क्षणांचे केलेले वर्णन पहा....

Two slips, a silly mid-off, and a forward short leg close to him as Hollies pitches the ball up slowly and …he’s bowled…Bradman bowled Hollies … nought …and what do you say under these circumstances? I wonder if you see the ball very clearly in your last Test in England, on a ground where you’ve played some of the biggest cricket in your life and where the opposing side has just stood round you and given you three cheers and the crowd has clapped you all the way to the wicket. I wonder if you see the ball at all.”

 

वेगाचा बादशहा उसेन बोल्ट याची अश्रूपूर्ण कहाणी काहीशी अशीच आहे. ज्या लंडनमध्ये पाच वर्षापूर्वी त्याने तीन-तीन आॅलिम्पिक सुवर्णपदकं जिंकली, जेथे तो आणि त्याच्या सहका-यांनी रिलेचा ३६.८४ सेकंदाचा विश्वविक्रम नोंदवला, त्याच लंडनमध्ये बोल्टला पहिल्यांदा १०० मीटरमध्ये कास्यपदकावर समाधान मानावे लागले आणि शनिवारी तर दुखापतीमुळे ४ बाय १०० मीटर रिलेची शर्यत तो पूर्णसुद्धा करू शकला नाही. ज्या ट्रॅकवर आयुष्यभर तो वा-याच्या वेगाने धावला त्याच ट्रॅकवर शेवटच्या शर्यतीत त्याला दुखण्यापायी वेदनेने विव्हळत डोळ्यात अ़श्रू घेऊन कोसळण्याची वेळ आली. योगायोगाने सर डॉन यांच्याप्रमाणेच ‘लायटनींग बोल्ट’ने आपली निवृत्ती लंडनच्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या आधीच जाहीर केलेली होती. त्यामुळे त्याच्या निरोपाच्या शर्यतींची जगभरातल्या रसिकांना कमालीची उत्सुकता होती आणि नेहमीप्रमाणे तो अजेय राहिल याची त्याच्या चाहत्यांना खात्री होती परंतु त्यांनाही बोल्टप्रमाणेच अश्रूंना वाट मोकळी करून द्यावी लागली.

या महान खेळाडूंच्या अखेरच्या खेळीतील अपयशाचे कारण  भावनावश झाल्याने डबडबलेले डोळे असो की आधीच्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ लांबल्याने झालेल्या उशिराने पायाला झालेली दुखापत असो, पण त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीच्या अपयशी निरोपावेळचे योगायोग मात्र विलक्षण अविश्वसनीय आहेत हे नक्की.