शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

केळी पिकास न देता गावासाठी दिले शेतातील विहिरीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 19:16 IST

यावल तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे.

ठळक मुद्देयावल तालुक्यातील नावरे येथील स्तुत्य उपक्रमप्रभारी सरपंच समाधान पाटील यांचे कौतुकगावास दररोज २० मिनिटे पाणीपुरवठा करणे झाले शक्यगुरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे. यामुळे सध्या तरी नावरेकरांचा पाणीप्रश्न सुटला आहे.या वर्षात तालुक्यातील अनेक गावांना इतिहासात कधी नव्हे अशा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांना दोन दिवसांपासून तर २० दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.तालुक्यातील नावरे येथील पाणीपुरवठा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बोराळे शिवारातील विहिरीवरून होतो. ते पाणी ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या दोन टाक्यांमध्ये आणून गावास पाणीपुरवठा होत असतो. मात्र सध्या बोराळे शिवारातील विहिरीची जलपातळी खालावली आहे. यामुळे गावातील पाण्याच्या दोन टाक्या भरल्या जात नाही. परिणामी गावात पाणीटंचाई निर्माण झाली.यावर तोडगा म्हणून प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी गावालगत असलेल्या त्यांच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन नावरे गावात येत असलेल्या पाईपलाईनशी जोडला आणि पाणीटंचाईचा प्रश्न सोडवला. त्यामुळे शासनास कोणाचीही विहीर अधिग्रहीत करावी लागली नाही. त्यामुळे आता गावास दररोज सुमारे २० मिनिटे पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. गुरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी खालावली. यातूनच संपूर्ण गावास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे दिसून आले. गावचे सरपंच म्हणून पाणीटंचाईचा प्रश्न सोडविणे गरजेचे वाटले आणि सरपंच म्हणून निर्णय घेत माझ्या शेतातून येत असलेल्या सार्वजनिक पाईपलाईन शेतातील विहिरीची पाईपलाईन जोडली. त्यामुळे आता दोन विहिरी मिळून गावाचा प्रश्न मिटला आहे. यासंदर्भात तहसीलदार जितें्रद कुवर यांच्याशी चर्चा करून सांगितले आहे, असे प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईYawalयावल